आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या लेकीचीच सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. सेलिब्रिटी मंडळींनी तर खास पोस्ट शेअर करत आलिया-रणबीरला नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या आनंदाच्या वातावरणामध्ये एका पाकिस्तानी अभिनेत्याने आलिया व रणबीरच्या लेकीबाबत केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पाकिस्तानी अभिनेता यासिर हुसैन आलिया-रणबीरला मुलगी झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टनंतर यासिरवर नेटकरी संतापले.
आणखी वाचा – Video : आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या लेकीचं नाव काय ठेवणार? नीतू कपूर म्हणाल्या…
यासिर हुसैन नेमका काय म्हणाला?
सेलिब्रिटी मंडळींनी आलिया-रणबीरला मुलगी झाल्यानंतर त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे खास पोस्ट शेअर करण्यास सुरुवात केली. यादरम्यान यासिरलाही इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट शेअर करण्याचा मोह आवरला नाही.
यासिर म्हणाला, “म्हणूनच आज कबीर (यासिरचा मुलगा) खूप खुश आहे. दोन देशांच्या मैत्रीसाठी मी तयार आहे.” पोस्टदरम्यान त्याने आलिया-रणबीरचा फोटोही शेअर केला होता. आपल्या लेकाने आलिया-रणबीरच्या लेकीला भेटावं अशी बहुदा यासिरची इच्छा असावी. त्याच्या या पोस्टनंतर यासिर बराच चर्चेत आला आहे.

यासिर पाकिस्तानमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. तसेच तो सुत्रसंचालकही आहे. पाकिस्तानी सुप्रसिद्ध अभिनेत्री इकरा अजीज व यासिरने २०१९मध्ये लग्न केलं. त्यानंतर २३ जुलै २०२१ला त्यांना मुलगा झाला.