तब्बल ४ वर्षांनी शाहरुख खानने ‘पठाण’ या चित्रपटामधून दमदार कमबॅक केलं आहे. या चित्रपटाने बॉलिवूडवर आलेलं सावट दूर केलं. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत एक दोन नव्हे तर तब्बल २० वेगवेगळे रेकॉर्ड या चित्रपटाने मोडीत काढले आहेत. गेल्यावर्षी आमिर खान, अक्षय कुमारसारख्या सुपरस्टार्सना जे जमलेलं नव्हतं ते शाहरुखने करून दाखवलं आहे.

मनोरंजनसृष्टीतील दिग्गज मंडळीसुद्धा शाहरुख खानच्या या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. बऱ्याच लोकांना हा चित्रपट पसंत पडला आहे. पाकिस्तानी कलाकारही यात मागे नाहीत. पाकिस्तानी व्हिडिओ जॉकी आणि अभिनेत्री अनुशे अश्रफ हिने नुकतंच शाहरुख खानच्या ‘पठाण’बद्दल आणि त्याच्या स्टारडमबद्दल भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : विश्लेषण : शाहरुख खानचा ‘पठाण’ एवढा सुपरहीट का झाला? जाणून घ्या यामागील पाच कारणं

सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून तिने एक पोस्ट केली आहे. त्यात ती म्हणाली, “लोक त्याला जेवढं नापसंत करतात, तेवढंच पाकिस्तानी लोकांना वाटतं की त्यांनी बॉलीवूडचा प्रचार करू नये. माझ्यासाठी शाहरुख हा जागतिक किर्तीचा सुपरस्टार आहे. कलाकार म्हणून आमचा विश्वास आहे की आम्ही सीमांची बंधनं ओलांडून लोकांशी जोडले जातो. जग आम्हाला फक्त माणूस म्हणून ओळखते आणि या माणसाने (शाहरुख) उल्लेखनीय कार्य केलं आहे. मी तुझी कायमची चाहती झाले आहे शाहरुख खान!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनुशे अश्रफच्या या पोस्टमुळे बऱ्याच पाकिस्तानी लोकांनी तिला ट्रोल केलं आहे. केवळ शाहरुख खानचं लक्ष वेधून घेण्यासाठी तिने ही पोस्ट केल्याचं अनेकांनी म्हंटलं आहे त्यांनासुद्धा अनुशेने चोख उत्तर देत ट्रोलर्सची तोंड बंद केली आहेत. पठाणने २०० कोटींचा टप्पा पार केला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने बॉलिवूडला तारलं आहे.