मिका सिंग हा लोकप्रिय भारतीय गायक आहे. त्याने चित्रपटांसाठी अनेक गाणी गायली आहे. मिकाचे फक्त भारतातच नाही तर जगभरात चाहते आहेत. मिका जगभरात शो करत असतो. सध्या तो अमेरिकेत कॉन्सर्ट करतोय. तेथील एका कॉन्सर्टमध्ये त्याच्या पाकिस्तानी चाहत्यांनी त्याच्यावर गिफ्ट्सचा वर्षाव केला. मिकाच्या कॉन्सर्टमधील एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

गायक मिका सिंगला अमेरिकेतील बिलोक्सी येथे एका कॉन्सर्ट दरम्यान त्याच्या चाहत्यांचा वेगळाच अनुभव आला. दमदार परफॉर्मन्ससाठी आणि लोकप्रिय गाण्यांसाठी ओळखला जाणारा मिका पाकिस्तानी चाहत्यांनी केलेल्या कृतीमुळे भारावून गेला. मिकाचे चाहते पाकिस्तानातून प्रवास करून त्याच्या कॉन्सर्टसाठी आले होते. त्यांनी मंचावर मिकाला कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तू दिल्या.

हेही वाचा – ८ वर्षांचं प्रेम, कुटुंबियांचा विरोध अन्…; ‘ही’ लोकप्रिय मुस्लीम अभिनेत्री ‘या’ दिवशी करणार आंतरधर्मीय लग्न

मिका परफॉर्म करत असताना त्याच्या पाकिस्तानी चाहत्यांनी त्याला महागड्या भेटवस्तू दिल्या. त्यांनी मिकाला पांढऱ्या सोन्याची साखळी, हिऱ्याच्या अंगठ्या आणि रोलेक्स घड्याळ दिले. या सर्व भेटवस्तूंची किंमत तब्बल तीन कोटी रुपये आहे, असे वृत्त मनी कंट्रोलने दिले आहे. मिकाने चाहत्यांनी दिलेल्या सर्व भेटवस्तू स्वीकारल्या आणि त्यांची गळाभेट घेतली. त्याचा त्याच्या पाकिस्तानी चाहत्यांबरोबरचा हा विरल भयानी या पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – “माझे ख्रिश्चन वडील ६ वेळा वैष्णोदेवीला गेले, तर मुस्लीम भाऊ…”; बॉलीवूड अभिनेत्याचा कुटुंबाबत खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हिडीओ –

मिका सिंग व त्याच्या पाकिस्तानी चाहत्यांचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. चाहत्यांनी केलेल्या या कृतीमुळे नेटकरी त्यांचं कौतुक करत आहेत. चाहते असावे असे, असं काही जणांनी म्हटलं आहे. तर काही जणांनी मिकाचे चाहते जगभरात आहेत, यासाठी आनंद व्यक्त केला.