बॉलिवूडच्या किंग खान शाहरुख खानने त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवत आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी आणि एकूणच चित्रपट रसिकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं. चित्रपटगृहात इतिहास रचल्यानंतर आता ‘पठाण' ओटीटी माध्यमावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकतंच या चित्रपटाबद्दल एका पाकिस्तानी अभिनेत्याने वक्तव्य केलं आहे. 'पठाण' चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकीनीमुळे वाद निर्माण झाला होता. मात्र शाहरुखच्या चाहत्यांनी चित्रपट पाहण्यासाठी गर्दी केली होती. जगभरातून चित्रपटाने १००० कोटींच्या वर व्यवसाय केला आहे. अशातच एका पाकिस्तानी अभिनेत्याने 'पठाण' चित्रपटाची खिल्ली उडवली आहे. यासिर हुसेन असं या अभिनेत्याचे नाव असून त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर केली आहे. घटस्फोटानंतर सिंगल असलेल्या समांथाला चाहत्याने विचारला रिलेशनशिपबद्दलचा प्रश्न; अभिनेत्री उत्तर देत म्हणाली… अभिनेत्याने स्टोरीमध्ये असं लिहलं आहे की "जर तुम्ही मिशन इम्पॉसिबल १ पाहिला असेल तर तुम्हाला शाहरुख खानचा पठाण तुम्हाला कथा नसलेला एक व्हिडीओ गेम वाटू शकतो." अशा शब्दात त्याने भावना व्यक्त केल्या आहेत. yasir दरम्यान ‘पठाण’ आता हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला असून सोशल मीडियावर याबद्दल चांगलीच चर्चा होत आहे. एसएस राजामौली यांचा ‘बाहुबली २’ चित्रपट २८ एप्रिल २०१७ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, त्याच्या हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर ५१०.९९ कोटींची कमाई केली होती. शाहरुख खानच्या या चित्रपटात दीपिका पदुकोण महत्त्वाच्या भूमिकेत आहे, तर जॉन अब्राहम नकारात्मक भूमिकेत आहे. शाहरुख आणि जॉनने पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली आहे