आपल्या दमदार अभिनयाने सर्वांना आपलंसं करणारे अभिनेते म्हणजे पंकज त्रिपाठी. सिनेमा वा ओटीटी, माध्यम कोणतेही असो; पंकज त्रिपाठींच्या अभिनयाचे कौतुक सर्व स्तरांतून करण्यात येते. सध्या पंकज त्रिपाठी त्यांच्या आगामी ‘मैं अटल हूं’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित असून पुढच्या वर्षी १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘मैं अटल हूं’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या नुकताच भेटीला आला. रवी जाधवांचं दिग्दर्शन, दमदार कथानक आणि पंकज त्रिपाठींच्या उत्तम अभिनयामुळे या 3 मिनिटं ३८ सेकंदाच्या ट्रेलरने सगळ्या सिनेप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं आहे. ट्रेलरमधला “एका मताच्या फरकामुळे आज आमचं सरकार पडलं याचं दु:ख मला अजिबात नाही. सरकार येणार अन् जाणार, राजकीय खेळ सुरू राहील पण, हा देश राहिला पाहिजे.” हा शेवटचा संवाद विशेष लक्ष वेधून घेतो. पंकज त्रिपाठी यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतल्याचं या ट्रेलरमध्ये दिसून येत आहे.

हेही वाचा : ठरलं तर मग : वाढदिवस, औक्षण अन्…; सुभेदारांचं सरप्राईज पाहून सायली भारावली, बायकोचा भूतकाळ शोधण्याचा अर्जुनने केला निर्धार!

‘मैं अटल हूं’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एका मराठी अभिनेत्रीची झलक पाहायला मिळत आहे. ‘जय मल्हार’ फेम अभिनेत्री गौरी सुखटणकरने या चित्रपटात भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. ट्रेलरमध्ये “नमस्कार मेरा नाम सुषमा स्वराज” अशी ओळख ती सांगत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : “आयुष्यभर…”, सुकन्या मोनेंनी लाडक्या लेकीसाठी हातावर काढला खास टॅटू, फोटो आला समोर…

View this post on Instagram

A post shared by Gaurri Sukhtankar (@sukhtankargaurri)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गौरी सुखटणकरच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर तिने यापूर्वी अनेक मालिका, हिंदी चित्रपट, वेबसीरिज, जाहिरातींमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारायला मिळणं ही तिच्यासाठी नक्कीच मोठी संधी आहे. रवी दादा आणि पंकज सरांबरोबर करायला मिळणं ही खूप मोठी गोष्ट असल्याचं तिने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.