पंकज त्रिपाठी लवकरच अटल बिहारी वाजपेयींचा बायोपिक ‘मैं अटल हूं’ या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. यावेळी त्यांनी एक जुना किस्सा सांगितला. पंकज म्हणाले की त्यांचा राजकारणाकडे कल होता, परंतु एक घटना घडली, ज्यानंतर ते निराश झाले आणि राजकारणाचा विचार त्यांनी डोक्यातून काढून टाकला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पंकज बिहारमधील त्यांच्या कॉलेजच्या दिवसांबद्दल बोलत होते. तेव्हा ते एबीव्हीपीचा एक भाग होते. “बिहारमध्ये प्रत्येकजण राजकारणी आहे,” असं ते यावेळी म्हणाले.

तुम्ही कधी राजकारणात येण्याचा विचार केला होता का? असं विचारल्यावर पंकज यांनी एक किस्सा सांगितला. त्यांचा राजकारणात यायचा विचार होता, पण एकदा अटक त्यांनी हा विचार सोडून दिला. “त्यावेळी मी राजकारणात येण्याचा विचार केला नव्हता. असं वाटत होतं की मी राजकारणात पुढे जाऊ शकेन पण नंतर अटक झाली आणि पोलिसांनी मला मारहाण केली म्हणून मी तो विचार तिथेच सोडून दिला,” असं पंकज त्रिपाठी ‘एएनआय’शी बोलताना म्हणाले.

जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड शिखर पहारिया काय काम करतो? २७ व्या वर्षी ‘इतक्या’ कोटींचा मालक आहे माजी मुख्यमंत्र्यांचा नातू

पंकज त्रिपाठी म्हणाले की त्याच काळात त्यांना रंगभूमीची आवड निर्माण झाली आणि त्या मार्गावर पुढे जाण्याचा निर्णय घेतला. “माझ्या आयुष्याच्या त्या टप्प्यावर मला रंगभूमीची आवड निर्माण होऊ लागली होती आणि त्यामुळे मी या क्षेत्राकडे जास्त आकर्षित झालो,” असं त्यांनी सांगितलं.

Video: सॉफ्टवेअर इंजिनिअरशी लग्न करून परदेशात थाटला संसार, अभिनेत्रीने गृहप्रवेश करत दाखवली नव्या घराची झलक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पीटीआय’ला २०१९ मध्ये दिलेल्या मुलाखतीत पंकज यांनी सांगितलं होतं की त्यांनी पाटणा येथील बेउर तुरुंगात एक आठवडा घालवला होता आणि त्या अनुभवाने त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले. “तुम्हाला तुरुंगात काही करायचं नसतं. मीटिंग नाही, स्वयंपाक नाही, काहीही नाही. तुम्ही पूर्णपणे एकटे असता. जेव्हा माणूस अत्यंत एकाकी असतो तेव्हा तो स्वतःला शोधू लागतो. त्या सात दिवसांत मी स्वतःला भेटलो. जेव्हा मी हिंदी साहित्य वाचायला सुरुवात केली तेव्हा मला जाणवलं की मी या जगापासून किती अलिप्त होतो. त्यानंतर माझ्यात पूर्णपणे बदल झाला,” असं पंकज म्हणाले होते.