मृगदीप सिंग लांबा दिग्दर्शित ‘फुकरे ३’ हा चित्रपट २८ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाला मागे टाकलं, तर प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी या चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाला मागे टाकलं आहे.
‘फुकरे ३’ ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ८.५० कोटींची केली करत दमदार ओपनिंग कलेक्शन केलं. तर यानंतरच्या दिवसांमध्येही या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांचा आलेख हा चढताच आहे. चार दिवसांमध्ये या चित्रपटाने एकूण ४० कोटींहून अधिक कमाई केली होती. शनिवार, रविवार आणि सोमवार या मिळालेल्या सुट्ट्यांचा या चित्रपटाला खूप फायदा झाला आहे. काल गांधी जयंतीच्या दिवशी या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.
‘सॅकनिल्क’च्या वृत्तानुसार, सोमवारी फुकरे तीन या चित्रपटाने एकूण ११.५० कोटींचा गल्ला जमावला आहे. हा आकडा काल ‘जवान’ने केलेल्या कमाई पेक्षा जास्त आहे. तर आतापर्यंत फुकरे तीन या चित्रपटाने एकूण ५४.९८ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे हा चित्रपट लवकरच १०० कोटींचा आकडा पार करेल अशी सर्वांना आशा वाटत आहे.
दरम्यान, या चित्रपटात पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मनजोत सिंग, रिचा चढ्ढा आणि पंकज त्रिपाठी यांची प्रमुख भूमिका आहे. हा चित्रपट ‘फुकरे’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे.