बॉलीवूडमधील ९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे काजोल. काजोल आपल्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर कित्येक वर्षं अधिराज्य गाजवत आहे. तिला अभिनयासाठी बरेच पुरस्कारही मिळाले आहेत. शिवाय २०११ साली काजोलला ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही गौरविण्यात आलं आहे. तिच्या ‘कुछ कुछ होता है’ या सुपरहिट चित्रपटाला आज २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटातील तिची अंजली ही भूमिका प्रेक्षकांना अजूनही खूप आवडते. अशातच सध्या काजोलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील तिच्या कृतीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – “कॅमेराच्या मॉनिटवर साप अन्…” अभिनेता अमेय वाघचा अंदमानमधील चित्रीकरणाचा अनुभव, म्हणाला…

सेलिब्रिटी ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर काजोलचा हा व्हायरल व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, एक पापाराझी काजोचा व्हिडीओ काढता काढता पडतो. यावेळी काजोल थांबते आणि त्याला त्याचा मोबाइल उचलून देते. मग ती मार्गस्थ होते. काजोलच्या याच कृतीने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – “हिंदू हा धर्म नाही, ही जगण्याची…,” अध्यात्माविषयी बोलताना मिलिंद गवळींचं वक्तव्य, म्हणाले…

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिका बंद होणार का? अभिनेते मिलिंद गवळी म्हणाले…

काजोलचा हा व्हिडीओ पाहून काही नेटकरी तिचं कौतुक करत आहेत, तर काही नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. “कदाचित तो विमल खाऊ अशक्त झाला असेल”, “पहिल्यांदा काजोल पडायची आता लोक तिला पाहून पडत आहेत”, “बोलो जुबा केशरी”, “हा काजोलचा परिणाम आहे”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – Video: भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान अरिजित सिंहने मागितला अनुष्का शर्माकडे फोटो; अभिनेत्रीने दिली ‘अशी’ रिअ‍ॅक्शन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काजोलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिची काही महिन्यांपूर्वी ‘डिस्नी प्लस हॉटस्टार’वर ‘द ट्रायल’ ही वेब सीरिज प्रदर्शित झाली होती. नायोनिका सेनगुप्ता हिच्या आयुष्याभोवती फिरणारी या वेब सीरिजची कहाणी होती. कोर्टरूममधील ड्रामा असलेल्या ‘द ट्रायल’ सीरिजमध्ये काजोल नायोनिकाच्या भूमिकेत दिसली होती.