बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आप’चे खासदार राघव चढ्ढा यांनी २४ स्प्टेंबरला लग्नगाठ बांधली. उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये या लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या लग्नाला बॉलिवूड सेलिब्रिटींसह अनेक नेते उपस्थिती लावली होती. परिणीती आणि राघव यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता लग्नानंतर हे नवं दाम्पत्य हनिमूनसाठी कुठं जाणार याबाबत चाहत्यांना उत्सुक्ता लागली आहे. मात्र परिणीती आणि राघव यांनी आपलं हनिमून रद्द केलं असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा- विराट कोहलीबद्दल विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नाला शाहरुख खानने दिलं भन्नाट उत्तर, म्हणाला, “आपला जावई…”

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, परिणीती आणि राघव यांनी आपल्या हनिमूनची योजना तुर्तास पुढे ढकलली आहे. परिणीती सध्या आपल्या सासरच्या लोकांबरोबर वेळ घालवत आहे. लवकरच ती आपल्या कामाला सुरुवात करणार आहे. तिचा आगामी चित्रपट ‘मिशन रानीगंज’चे प्रमोशन कार्यक्रमांमध्येही परिणीती सहभागी होणार आहे. तर नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलवण्यात येणार आहे. सध्या या अधिवेशानचे मोठ्या प्रमाणात काम असल्यामुळे राघव चढ्ढा यांच्याकडेही वेळ नसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पक्ष पंधरवडा सुरु होत असल्याने या जोडप्याने आपलं हनिमून पुढं ढकलल्याच सांगण्यात येत आहे.

लग्नानंतर परिणीती आणि राघव ३ ठिकाणी रिसेप्शन देणार असल्याचे सांगण्यात येत होते. मुंबई, दिल्ली आणि चंदीगढमध्ये. बॉलीवूडमधील कलाकारांसाठी मुंबईत, राजकीय नेत्यांसाठी दिल्लीत आणि नातेवाईकांसाठ चंदीगढमध्ये परिणीती आणि राघव रिसेप्शन देणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता दिल्ली आणि चंदीगढमधील रिसेप्शनचा विचार तुर्तास रद्द करण्यात आला असून फक्त मुंबईतच रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. ४ ऑक्टोबरला मुंबईत परिणीती आणि राघव यांच्या लग्नाचं रिसेप्शनचे आयोजन करण्यात आलं आहे.