परिणीती चोप्रा व खासदार राघव चड्ढा यांच्या अफेअरच्या बातम्या सध्या चांगल्याच चर्चेत आहे. दोन दिवसांपूर्वीच आपचे खासदार संजीव अरोरा यांनी ट्वीट करून या दोघांना शुभेच्छा दिल्या होत्या, त्यानंतर त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झालंय. अशातच आता पुन्हा एकदा परिणीती चोप्रा व खासदार राघव चड्ढा दिल्ली एअरपोर्टवर एकत्र दिसले आहेत.

“तो मला बाथरूममध्ये घेऊन गेला अन्…”; शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव

लग्नाच्या अफवांदरम्यान अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा बुधवारी रात्री दिल्ली विमानतळावर एकत्र दिसले. यावेळी पत्रकारांना टाळून परिणीती घाईघाईने कारमध्ये शिरताना दिसली. तिने काळ्या रंगाचे कपडे घातले होते. राघव चड्ढाही तिच्याबरोबर होते, नंतर तेही घाईघाईने कारमध्ये बसून निघून गेले.

parineeti chopra raghav chadhha
परिणीती चोप्रा व राघव चड्ढा

राघव व परिणीती या दोघांच्या कुटुंबियांची लग्नाबद्दल बोलणी सुरू असल्याची माहितीही समोर आली आहे. परिणीती बुधवारी एअरपोर्टवर दिसली होती, तेव्हा राघव चड्ढाबद्दल प्रश्न विचारल्यावर ती लाजताना दिसली.

यापूर्वी राघव यांना प्रश्न विचारला असता ‘मला राजकारणाबद्दल विचारा, परिणीतीबद्दल नाही’, असं उत्तर त्यांनी दिलं होतं.