अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि ‘आम आदमी पार्टी’चे खासदार राघव चड्ढा या दोघांच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा सुरू आहे. आयपीएल मॅच असो किंवा रेस्टॉरंट, दोघांनाही सतत एकत्र स्पॉट केले जात असून काही सूत्रांच्या म्हणण्यानुसार, दोघेही १३ मे रोजी किंवा त्यापूर्वी साखरपुडा करणार आहेत. परंतु याबाबत दोघांकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

हेही वाचा : प्रियांका चोप्रा रेड कार्पेटवर पडली अन् पापाराझींनी चक्क… अभिनेत्री म्हणाली, “माझ्या २३ वर्षांच्या करिअरमध्ये…”

दरम्यान, मंगळवारी दिल्ली एअरपोर्टवर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा दोघेही पुन्हा एकदा एकत्र दिसले. या दोघांना पाहिल्यावर पापाराझींनी त्यांना घेरले आणि प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. अनेकांनी “लग्नाला आम्हाला बोलवणार का?” असे प्रश्नही परिणीती आणि राघव चड्ढांना विचारले. यावर परिणीतीने दरवेळीप्रमाणे ‘धन्यवाद’ बोलत एअरपोर्टवरुन काढता पाय घेतला. तसेच काही फोटोग्राफर्सनी “भाई-भाभी” म्हणत अभिनंदन केल्यावर मात्र, राघव चड्ढा हळूच हसू लागल्याचे व्हिडीओत दिसत आहे. सध्या या दोघांचा एअरपोर्टवरील हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

परिणीती आणि राघव यांना पापाराझींनी सर्वप्रथम मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेर एकत्र पाहिले होते. यानंतर दोघेही अनेक ठिकाणी एकत्र दिसले. राघव चड्ढा परिणीतीच्या स्वागतासाठी दिल्ली एअरपोर्टवर सुद्धा आले होते. तसेच दोघेही आयपीएल सामना पाहण्यासाठी मोहालीत आल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. यावेळी चाहत्यांनी “परिणीती भाभी जिंदाबाद” अशा घोषणाही दिल्या होत्या.

हेही वाचा : समलिंगी विवाहाबाबत भूमी पेडणेकरचे स्पष्ट मत! म्हणाली, “देवाने आपल्या सर्वांना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिणीती चोप्रा शेवटची सूरज बडजात्याच्या उंचाई चित्रपटामध्ये दिसली होती. लवकरच इम्तियाज अलीच्या ‘चमकिला’मध्ये परिणीती दिलजीत दोसांझसोबत प्रमुख भूमिकेत दिसेल.