गेल्या चार-पाच दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या अफेअरच्या चर्चा होत आहेत. दोघेही दोन दिवस मुंबईत एकत्र दिसले होते, त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या बातम्या येऊ लागल्या. दोघेही एकत्र शिकले असून चांगले मित्र असल्याची माहिती आली होती. पण, ‘परिणीतीबद्दल नाही तर राजकारणाबद्दल विचारा’, असं म्हणत राघव चड्ढा लाजले आणि पुन्हा एकदा त्यांच्या अफेअरबद्दल चर्चा होऊ लागली आहे.

परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा खरंच एकमेकांना डेट करत आहेत? समोर आलं सत्य

राघव आणि परिणिती या दोघांनीही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतले आहे आणि त्यांचे अनेक कॉमन मित्र आहेत, या व्यतिरिक्त त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. पण, आता एका रिपोर्टनुसार त्यांच्या कुटुंबियांनी लग्नाबद्दल बोलणी सुरू केली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’मधील एका वृत्तानुसार, परिणीती व राघव या दोघांच्या कुटुंबियांनी लग्नाबाबत चर्चा सुरू केली आहे.

अहवालात पुढे असं म्हटलं आहे की राघव आणि परिणीती चोप्रा दोघेही एकमेकांना पसंत करतात आणि त्यांच्या आवडी-निवडी सारख्या आहेत. दोघांच्या जवळच्या सूत्राच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांची कुटुंबही एकमेकांना काही काळापासून ओळखत आहेत आणि लवकरच या दोघांच्या नात्याबद्दल औपचारिक घोषणा केली जाईल.

महिलांना सेक्ससाठी विचारणा, ‘मी टू’चे आरोप, अन्…; अभिनेत्याने फेसबुक लाइव्हवर केली घटस्फोटाची घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अजून कोणताही औपचारिक समारंभ झालेला नाही, पण कुटुंबीय त्याबाबत चर्चा करत आहेत आणि लवकरच यांसदर्भात अधिकृत माहिती समोर येईल. राघव प परिणीती एकत्र आल्याने दोन्ही कुटुंबं आनंदी आहेत, परंतु दोघे आपापल्या कामात व्यग्र असल्याने कोणत्याही समारंभाची तारीख निश्चित करणे कठीण आहे. हा समारंभ जवळच्या कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत होईल,” अशी माहिती सूत्राच्या हवाल्याने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिली आहे.