बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा हे दोघेही सध्या चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. पण या दोघांनीही त्यांच्या नात्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केलेले नाही. पण त्यातच आता परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची तारीख समोर आली आहे.

परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा नुकतंच एकत्र दिल्लीसाठी रवाना झाले. हे दोघेही एकाच गाडीने विमानतळावर पोहोचले होते. त्या दोघांचा एक व्हिडीओही समोर आला आहे. यावेळी परिणितीने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर राघव चड्ढा यांनी काळ्या रंगाच्या शर्ट परिधान केल्याचे पाहायला मिळाले.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये संधी कशी मिळाली? शिवाली परबने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली “आगरी भाषा…” 

परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची तारीख समोर आली आहे. येत्या १३ मे रोजी हे दोघेही साखरपुडा करणार असल्याचे बोललं जात आहे. त्या दोघांच्या साखरपुड्याची जय्यत तयारी केली जात आहे. परिणिती आणि राघव दिल्लीत साखरपुडा करणार आहे.

या साखरपुड्यासाठी १५० लोकांना आमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित असणार आहे. त्यांच्या साखरपुडा समारंभात सकाळी सुखमणी साहिबचे पठण केले जाईल. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या हातात अंगठी घालत साखरपुडा करतील. यानंतर छान डिनरचे आयोजन करण्यात आले आहे.

आणखी वाचा : “…तोपर्यंत मी लग्न करणार नाही”, परिणीती चोप्राने ‘त्या’ प्रश्नावर दिलेले थेट उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा हे दोघे कधी लग्नबंधनात अडकणार याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण या वर्षाच्या अखेरीस हे दोघेही विवाहबंधनात अडकू शकतात, अशी चर्चा समोर येत आहे. मात्र अद्याप याबदद्ल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.