बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा धामधुमीत पार पडला. सध्या त्यांच्या साखरपुड्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या साखरपुड्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. त्यानंतर आता परिणीतीने राघव चड्ढांबरोबर पहिली भेट कुठे आणि कशी झाली, याबद्दलचा खुलासा केला आहे.

परिणीती चोप्रा ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना दिसते. नुकतंच परिणीतीने इन्स्टाग्रामवर तिच्या साखरपुड्याचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना तिने त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : “माझी अनेक लग्न झालीत, मला दोन मुलं आहेत अन् माझे दुबई, अमेरिकेत…” जुई गडकरीच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष

परिणीती चोप्राची पोस्ट

जेव्हा तुम्हाला माहीत असते, तेव्हा माहितच असतं. एकदा एकत्र नाश्ता केला आणि ही तीच व्यक्ती आहे, याची मला जाणीव झाली. शांत, संयमी, शक्तीशाली आणि प्रेरणादायी असलेला एक आदर्श व्यक्ती. त्याचा पाठिंबा, विनोदबुद्धी आणि मैत्री यात निखळ आनंद आहे. तो माझं घर आहे.

आमच्या साखरपुड्याची पार्टी हे एक स्वप्नच होतं. जे आम्ही जगलो. त्यात प्रेम, मजा, मस्ती, डान्स हे सर्व काही होतं. यावेळी आम्ही आमच्या प्रियजनांना मिठी मारली आणि त्यांच्यासोबत हा आनंद साजरा केला. त्यावेळी आमच्या भावना ओसंडून वाहत होत्या. मी लहान असताना राजकन्येच्या गोष्टी ऐकल्या होत्या. माझी कथा अशीच काहीशी सुरु होईल, याची मी कल्पनाही केली होती. पण हे माझ्या कल्पनेपेक्षाही अधिक चांगले होते, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : “…आणि त्याने मला किस केलं” रसिका सुनीलचे वक्तव्य चर्चेत, म्हणाली “माझ्या नवऱ्याला…”

आणखी वाचा : “आमच्या एकत्र येण्यामुळे…” साखरपुड्यानंतर परिणीती चोप्राने केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली “या काळात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांचा शनिवारी १३ मे रोजी साखरपुडा पार पडला. यावेळी परिणितीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर राघवनेही त्याच रंगाचा सूट परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. “मी प्रार्थना केली… अखेर ती हो म्हणाली”, असे कॅप्शन राघव यांनी या फोटोला दिले आहे. या फोटोत राघव चड्ढा आणि परिणिती साखरपुड्याची अंगठी पाहायला मिळत आहे.