scorecardresearch

“राहुल, राजच्या भूमिका मी साकारल्या पण…” अनेक वर्षांनंतर शाहरुख खानचा मोठा खुलासा

या चित्रपटात शाहरुखबरोबर दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत

“राहुल, राजच्या भूमिका मी साकारल्या पण…” अनेक वर्षांनंतर शाहरुख खानचा मोठा खुलासा
फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

शाहरुख खान त्याच्या ‘पठाण’मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. चित्रपटाची चांगलीच हवा निर्माण करण्यात शाहरुखला चांगलंच यश मिळालं आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर दुबईच्या बुर्ज खलिफावर प्रदर्शित करण्यात आला. साऱ्या जगभरात शाहरुखचे चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात आहेत. या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग परदेशात सुरू झाले आहे. या चित्रपटातून शाहरुख खानचे एक मोठे स्वप्न साकार होणार आहे.

शाहरुख या चित्रपटातून तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. शाहरुखचे चाहतेदेखील यासाठी उत्सुक आहेत. यशराज फिल्म्सने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये शाहरुख खान दिसत आहे तो म्हणतो की, “३२ वर्षांपूर्वी मी ॲक्शन हिरो बनण्यासाठी फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. पण, तसे झाले नाही आणि त्याऐवजी माझी प्रतिमा रोमँटिक हिरो अशी बनवली गेली.”

‘द काश्मीर फाइल्स’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार; दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री ट्वीट करत म्हणाले…

शाहरुख व्हिडीओमध्ये पुढे म्हणतो, “मला फक्त ॲक्शन हिरो व्हायचं होतं. म्हणजे मला डीडीएलजे, राहुल आणि राजच्या भूमिकाही खूप आवडल्या पण, मी नेहमीच ॲक्शन हिरो बनण्याचा विचार केला. त्यामुळे आता माझे हे स्वप्न पूर्ण होणार आहे.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

या चित्रपटात शाहरुखबरोबर दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. शिवाय आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांच्यासुद्धा महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २५ जानेवारी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 19:02 IST

संबंधित बातम्या