प्रसिद्ध नाटककार व अभिनेते पियुष मिश्रा त्यांच्या अष्टपैलू अभिनयासाठी ओखळले जातात. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. ते संगीतकारही आहेत, तसेच ते कविताही लिहितात. अलीकडेच पियुष मिश्रा यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही खुलासे केले. तसेच चाहत्यांनी प्रेमाने देवाचा दर्जा दिला होता असा खुलासाही त्यांनी केला. यामुळेच पियुष मिश्रा यांनी आपल्या जीवन प्रवासाला पुस्तकाचे रूप दिले आहे.

स्क्रिनवर तुझे किसिंग सीन पाहून पत्नीची प्रतिक्रिया काय असते? इमरान हाश्मी म्हणालेला, “ती मला…”

पियुष यांनी त्यांचं आत्मचरित्र लिहिलं आहे. त्याला ‘तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा’ असं नाव दिलंय. हे आत्मचरित्र त्यांनी देव मानणाऱ्या तरुणांना समर्पित केले आहे. ‘आज तक’शी बोलताना पियुष म्हणाले, “ज्यांना मी सज्जन वाटतो आणि जे मला आपला आदर्श मानू लागले किंवा देव समजू लागले होते, त्यांना मी हे पुस्तक अर्पण केले आहे. माझ्या आयुष्यातील त्या काळ्या सत्याबद्दल त्यांना कळावं, मीही एक अतिशय सामान्य व्यक्ती आहे हे त्यांना समजावं, अशी माझी इच्छा होती. मी माझ्या पुस्तकात त्या सर्व चुका, घाणेरड्या सवयींचा उल्लेख केला आहे, जेणेकरून त्यांना मी माणूस आहे आणि चुका करत राहतो, हे कळावं.”

परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा खरंच एकमेकांना डेट करत आहेत? समोर आलं सत्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पियुष पुढे म्हणतात, “खरं सांगायचं झाल्यास आता हळूहळू वैराग्य येत आहे. आता कोणतेही काम करण्याची इच्छा नाही. असं वाटतंय आता मरणाने पछाडलंय. जसजसा मी मृत्यू जवळ पोहोचत आहे, तसतशी माझी काम करण्याची इच्छाशक्ती कमी होत चालली आहे. काम करण्याची देखील एक मर्यादा असते, किती दिवस काम करत राहणार. या शर्यतीत किती दिवस धावणार? थकल्यानंतर निवांत बसावं, अशी सर्वांचीच इच्छा होते, म्हणून मी आजकाल तेच करत आहे, हळूहळू मी मृत्यूकडे जाण्याच्या तयारीत आहे.”