अभिनेता सलमान खानच्या मुंबईतल्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी जमली आहे. ही गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची बातमी समोर आली आहे. आज रमजान ईद आहे. त्यामुळे सलमान खानची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली आहे. सलमान खान वांद्रे येथील बँडस्टँड भागात राहतो. सलमानची एक झलक पाहण्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणावर जमले आणि पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. ANI ने हे वृत्त दिलं आहे. तसंच या लाठीचार्जचा व्हिडीओही पोस्ट केला आहे.

रमजान ईदमुळे सलमानच्या घरासमोर गर्दी

आज रमजान ईद आहे. त्यामुळे सलमान खानच्या वांद्रे येथील घरासमोर चाहत्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. सलमानची एक झलक पाहण्यासाठी , सेल्फी काढण्यासाठी, त्याचे फोटो काढण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली आहे. ही गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणावर होऊ लागली ती पांगवण्यासाठी अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेता सलमान खान हा त्याच्या सिनेमांसाठी आणि बॉलिवूडमधल्या त्याच्या खास स्टाईलसाठी ओळखला जातो. सलमान खानचं वय ५५ पेक्षा जास्त असलं तरीही तो आजही स्टाईल आयकॉन आहे. सलमान खानचा टायगर थ्री चित्रपट गेल्याच वर्षी प्रदर्शित झाला होता. तसंच सलमान खानचा खास असा एक चाहता वर्ग आहे. सलमान खानचा वाढदिवस असो, ईद असो चाहते त्याच्या घराबाहेर थांबतातच. सलमानने गॅलरीत येऊन त्यांना एक झलक दाखवावी अशी त्यांची अपेक्षा असते. सलमान खानची भेट आज खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतली आणि त्याला ईदच्या शुभेच्छा दिल्या. दुसरीकडे चाहते मोठ्या प्रमाणावर त्याच्या घराबाहेर थांबले होते. ही गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली की पोलिसांना अखेर सौम्य लाठीचार्ज करुन गर्दी पांगवावी लागली.