पूजा भट्ट सध्या ‘बिग बॉस ओटीटी २’ मध्ये दिसत आहे. शोमध्ये ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तसेच कामाबद्दल बोलताना दिसते. फक्त शोमध्येच नाही तर खऱ्या आयुष्यातही पूजा खूप स्पष्टवक्ती आहे. पूजा महेश भट्ट यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. एका मुलाखतीत पूजाने तिच्या सावत्र आईविषयी म्हणजेच सोनी राजदान यांच्याबद्दल एक खुलासा केला होता.

२४ व्या वर्षी लग्न करून गाठली मुंबई, झीशान अय्युब-रसिका आगाशे संघर्षाचे दिवस आठवत म्हणाले, “दोन रुपये…”

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते महेश भट्ट यांचं आयुष्य खूप चढ-उतारांनी भरलेलं राहिलं आहे. महेश भट्ट यांची दोन लग्नं व अफेअरची प्रचंड चर्चा झाली होती, किंबहुना आजही होत असते. त्यांचं पहिलं लग्न किरण भट्टशी झालं होतं. या दोघांना राहुल व पूजा नावाची अपत्ये आहेत. विवाहित असूनही महेश भट्ट परवीन बाबींच्या प्रेमात पडले, दोघांच्या अफेअरची प्रचंड चर्चाही झाली होती. परवीन बाबींच्या मृत्यूनंतर त्यांच्या आयुष्यात सोनी राजदान यांची एंट्री झाली आणि या दोघांनी लग्न केलं.

’72 Hoorain’: चित्रपट अप्रूव्ह पण ट्रेलर रिजेक्ट, सेन्सॉर बोर्डावर संतापलेले निर्माते म्हणाले, “एका मृतदेहाचे…”

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत पूजा म्हणाली होती, “मी एका अशा वडिलांबरोबर मोठी झाली, ज्यांनी कथितरित्या दुसऱ्या महिलेशी लग्न केलं आणि दुसरा संसार थाटला. एके दिवशी आम्ही कुन्नूरला जात होतो आणि त्या (सोनी राजदान) बाहेर बसल्या होत्या आणि मला म्हणाल्या, ‘पूजा मला तुला सांगायचं आहे की मला खूप अपराधी वाटतं.'”

View this post on Instagram

A post shared by Pooja B (@poojab1972)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोनी राजदान यांचं म्हणणं ऐकून पूजाने त्यांना समजावून सांगितलं आणि त्यांच्या निर्णयावर विश्वास ठेवण्यास सांगितलं. ‘तुम्ही पश्चाताप करण्याचं किंवा अपराधी वाटून घेण्याचं कारण नाही, कारण तुम्ही कोणाचंही लग्न मोडलं नाही’, असं पूजाने सोनी राजदान यांना सांगितलं होतं. दरम्यान, या सगळ्या गोष्टींना आता बरीच वर्षे उलटून गेली आहेत. सोनी व महेश यांना शाहीन व आलिया नावाच्या दोन मुली असून आलियाने रणबीर कपूरशी लग्न केलं आहे.