पूजा भट्ट ‘बिग बॉस ओटीटी २’मुळे बरीच चर्चेत आली. शोमध्ये ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तसेच कामाबद्दल बोलताना दिसली. फक्त शोमध्येच नाही तर खऱ्या आयुष्यातही पूजा खूप स्पष्टवक्ती आहे. पूजा महेश भट्ट यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. आपल्या वडिलांनाच कीस करतानाचं फोटोशूट केल्याने ९० च्या दशकात पूजा भट्टवर प्रचंड टीका झाली होती. आपल्या बोल्ड इमेजमुळे पूजा कायम चर्चेत असते.

नुकतंच पूजाने अभिनेत्री सनी लिओनीबद्दल भाष्य केलं आहे. यूट्यूबर सिद्धार्थ कन्ननशी संवाद साधताना तिने बिपाशा बसू आणि जॉन अब्राहमच्या ‘जीस्म’ चित्रपटाबद्दल भाष्य केलं. या चित्रपटासाठी सर्वप्रथम पूजा सनी लिओनीला घ्यायचा विचार करत होती. याबद्दलच तिने या मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.

आणखी वाचा : शाहरुखचा ‘जवान’ सनीच्या ‘गदर २’वर भारी; तिसऱ्या दिवशी ‘इतक्या’ कोटींचा गल्ला करत मोडले ‘हे’ रेकॉर्ड

पूजा म्हणाली, “मला जीस्मच्या पहिल्या भागात सनी लिओनीला घ्यायचं होतं. बिपाशाला भेटण्याआधी मी सनीबद्दल वाचलं होतं. त्यावेळी माझ्या ऑफिसमधून आम्ही अमेरिकेत तिच्या मॅनेजरशी संपर्क साधला. त्यावेळी तिने नुकतंच पेंटहाऊसबरोबर एक करार केला होता, अन् त्या करारामुळे तिला यासाठी काम करायला जमणार नव्हतं. त्यानंतर आम्ही बिपाशाकडे गेलो, अर्थात बिपाशाची निवड हीदेखील उत्तमच ठरली. तिची आणि जॉनची पडद्यावरील केमिस्ट्री ही लाजवाब होती.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर ‘बिग बॉस’च्या पाचव्या सीझनमध्ये सनी लिओनीने हजेरी लावली. ही पाहून महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांनी सनीला ‘जीस्म २’मध्ये घ्यायचं ठरवलं. अशाअर्थी पहिल्या नव्हे तर ‘जीस्म २’साठी सनीची निवड करण्यात आली. सनीआधी ‘जीस्म २’साठी मल्लिका शेरावतचाही विचार करण्यात आला असल्याचं पूजाने स्पष्ट केलं.