सलमान खानसुद्धा एका मोठ्या काळानंतर बॉक्स ऑफिसवर कमबॅक करण्यास सज्ज आहे. ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटातून सलमान खान आणि पूजा हेगडे पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात व्यंकटेश दग्गुबती, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, पूजा हेगडेने अलीकडेच खुलासा केला की जेव्हा ती पहिल्यांदा सलमानला भेटली तेव्हा ती त्याला ‘भाई’ म्हणायची.

हेही वाचा- “अक्षय कुमार मला सतत फोन करत होता पण..”; रॅपर हनी सिंगचा मोठा खुलासा

न्यूज १८ शी बोलताना पूजाने सांगितले की, ती सुरुवातीला सलमानला ‘भाई’ म्हणून हाक मारायची. पूजा म्हणाली ‘सुरुवातीला मी जेव्हा त्याला भेटले तेव्हा मी त्याला भाई म्हणायचे. कारण सगळे त्याला असेच हाक मारायचे. सारे जग त्याला भाईजान म्हणते, त्यामुळे मीही त्याला असेच काहीसे हाक मारणे स्वाभाविक होते. शूटिंगदरम्यानही सगळे त्याला भाई-भाईजान म्हणत होते. शुटिंगदरम्यानही अनेकदा माझ्या तोंडून सलमानला भाई म्हणून हाक मारली जायची. ज्याची तिथे खिल्ली उडवली जात होती, कारण चित्रपटातील आमची व्यक्तिरेखा यापेक्षा वेगळी आहे.

हेही वाचा- अ‍ॅपलचे सीईओ अंबानी कुटुंबाला दर महिन्याला देणार इतकं भाडं; रक्कम ऐकून बसेल धक्का

अभिनेत्रीने पुढे खुलासा केला की ती आता सलमान खानला ‘एसके’ म्हणते. पूजाला विचारण्यात आले की जेव्हा तिने सलमानला ‘भाई’ म्हटले तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय होती, ती म्हणाली, ‘आता, मी त्याला एसके म्हणते कारण त्याने मला तसे करण्यास सांगितले आहे. त्याने मला सांगितले की मी त्याला सलमान देखील म्हणू शकते, पण मी नाही म्हणाले! मग मी त्याला सलमान सर म्हणले, पण तो मला मॅडम म्हणू लागला. मी त्यांना तसे न करण्यास सांगितले. आता आम्ही एस.के.मध्ये स्थायिक झालो आहोत.

हेही वाचा- “सलमान, चित्रपट करणंच थांबव आता…”, ‘किसी का भाई किसी की जान’मधील नव्या गाण्यामुळे नेटकरी नाराज; म्हणाले, “या वयात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘किसी का भाई किसी की जान’चा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. चित्रपटातील सलमान खान आणि पूजा हेगडेची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. चाहते दोघांना पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. हा चित्रपट २१ एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.