Pranitha Subhash Welcomes Second Child: दाक्षिणात्य तसेच बॉलीवूड चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री प्रणिता सुभाष (Pranitha Subhash) दुसऱ्यांदा आई झाली आहे. प्रणिताने स्वतः चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. प्रणिताला एक मुलगी आहे, आता तिने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे.

अभिनेत्री प्रणिता सुभाषने २०२१ मध्ये आलेल्या ‘हंगामा २’ चित्रपटात शिल्पा शेट्टीसह (Shilpa Shetty) काम केलं होतं. तिने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्राम अकाउंटवर बेबी बंपचे फोटो शेअर करून ती दुसऱ्यांदा गरोदर असल्याची माहिती दिली होती. आता प्रणिता एका मुलाची आई झाली आहे. ‘ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत प्रणिताने एका मुलाच्या जन्माचा आनंद व्यक्त केला आहे. “हे सगळं खूप छान आहे. मी आणि माझी मुलगी अर्ना आम्ही खूपच आनंदी आहेत. अर्ना त्याला ‘बेबी’ म्हणते, पण मला वाटतं की हा तिचा भाऊ आहे हे तिला अजून कळत नाही,” असं प्रणिता म्हणाली.

‘साथ निभाना साथिया’ फेम मराठमोळ्या रुचाचा पती काय काम करतो? तिची लेक कशी दिसते? जाणून घ्या

पहिल्या गर्भधारणेपेक्षा दुसऱ्यांदा तिला बऱ्याच गोष्टींची माहिती होती, असंही प्रणिताने सांगितलं. “मी पहिल्यांदा गरोदर होते, तेव्हा मी फक्त सर्वांचे सल्ले ऐकत होते आणि प्रवाहाबरोबर जात होते. मला काहीच कळत नव्हतं. यावेळी मला वाटते की मी चिल आहे, कारण मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत,” असं प्रणिता म्हणाली.

Pranitha Subhash welcomes second child
प्रणिता सुभाष आणि तिची लेक अर्ना (फोटो – इन्स्टाग्राम)

प्राजक्ता माळीच्या सिनेमातील नरसिंह शास्त्री यांच्या भूमिकेतील ‘या’ मराठी अभिनेत्याला ओळखलंत का?

प्रणिता सुभाषचा पती

प्रणिता सुभाषने (Pranitha Subhash husband) तीन वर्षांपूर्वी ३० मे २०२१ रोजी बंगळुरूतील एका बिझनेसमनशी लग्न केलं. तिच्या पतीचे नाव नितीन राजू आहे. तिने सोशल मीडियावर तिच्या लग्नाची माहिती देऊन चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता, कारण तिने गुपचूप लग्न केलं होतं. लग्नानंतर वर्षभरात तिने आनंदाची बातमी दिली होती. २०२२ मध्ये प्रणिताने एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर आता ती दुसऱ्यांदा आई झाली आहे.

२० सिनेमे फ्लॉप, १३ वर्षे चित्रपटांपासून दूर; बॉलीवूड अभिनेता तरीही कमावतो बक्कळ पैसे, करतो ‘हे’ काम

प्रणिता सुभाषचे करिअर

प्रणिताने २०१० मध्ये ‘बावा’ या चित्रपटातून दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर, ती २०१३ मध्ये रिलीज झालेल्या ‘अत्तरिंटिकी दरेडी’ आणि २०१६ मध्ये रिलीज झालेल्या ‘ब्रह्मोत्सवम’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. ती शेवटची कन्नड रोमँटिक कॉमेडी ड्रामा फिल्म ‘रमन्ना अवतार’ मध्ये दिसली होती. अभिनेत्री आणि उद्योजिका प्रणिता सुभाष हिने कन्नड, तमिळ, हिंदी, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं आहे.