भारतीय सण समारंभ देशात मोठ्या उत्सहाने साजरा करतात. सामान्य जनतेप्रमाणे बॉलिवूडमधील कलाकार देखील सण समारंभ आनंदाने साजरा करतात. नुकताच बॉलिवूडमध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. सध्या चर्चा आहे ती बॉलिवूडमधील करावा चौथ या सणाची, बॉलिवूडमधील जोडप्यांचे करावा चौथचे फोटो सध्या सगळीकडे व्हायरल होत आहेत. भारतात हा सण यंदा मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो आहे तिकडे अमेरिकेत प्रियांका चोप्रानेदेखील हा सण साजरा केला आहे.

प्रियांका चोप्रा, निक जोनस हे मनोरंजनसृष्टीतील सर्वात लोकप्रिय लोकप्रिय जोडपे आहे. सोशल मीडियावर या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ दररोज व्हायरल होताना दिसतात. प्रियांकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर करत हा सण साजरा केल्याची माहिती दिली. प्रियांका सध्या निकसोबत लॉस एंजेलिसमध्ये राहते. तिने आपल्या हातावर मेहंदीने निकचे आद्याक्षरे लिहली आहेत. तिने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहले आहे, ‘करावा चौथच्या सगळ्यांना शुभेच्छा, निकजोनास बरोबर साजरा करत आहे’.

तैमूर नव्हे तर यावेळी धाकट्या मुलाबरोबरचा फोटो करीनाने केला शेअर, म्हणाली “आम्ही दोघे… “

प्रियांका चोप्रा आज जागतिक स्तरावरची लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. अलिकडेच प्रियांका चोप्राने डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीच्या वुमन लीडरशिप फोरम कॉन्फरन्समध्ये अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्याशी संवाद साधला. प्रियांकाने काही दिवसांपूर्वी इराणमधील महिलांनी हिजाब विरोधात पुकारलेल्या आंदोलनामागच्या त्यांच्या धाडसाचं खूप कौतुक केलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
priyanka chopra

प्रियांका निकने १ डिसेंबर २०१८ रोजी भारतात लग्न केले आहे. तीन दिवस विवाहसोहळा सुरु होता. प्रियांका अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या वेब शो सिटाडेलमध्ये काम करणार आहे. तसेच ती एका जर्मन रिमेकमध्ये दिसणार आहे.