प्रियांका चोप्राने २०००मध्ये मिस वर्ल्डचा किताब पटकावला. वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी तिला हे यश मिळालं. आज तिने फक्त बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. मिस वर्ल्डचा किताब पटकवल्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. मिस वर्ल्ड होण्यापूर्वी प्रियांका कशी दिसत होती? याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

आणखी वाचा – पांढरे केस, मिशी अन् थकलेला चेहरा, अविनाश नारकरांना तुम्ही ओळखलं का? लग्नाला २७ वर्ष पूर्ण होताच म्हणाले…

सोशल मीडिया अकाऊंटद्वारे प्रियांकाच्या एका चाहतीने व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये चाहती तिची आई नव्वदच्या दशकामध्ये प्रियांकाला भेटली असल्याचं सांगताना दिसत आहे. तिने एका व्हिडीओद्वारे प्रियांकाचे आईसह असलेले फोटोही शेअर केले आहेत.

चाहतीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये प्रियांकाचा एक वेगळाच लूक पाहायला मिळत आहे. अगदी तरुण असताना प्रियांका कशी दिसत होती हे या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. प्रियांकाने या व्हिडीओमध्ये टॉप व काळ्या रंगाचा स्कर्ट परिधान केलेला दिसत आहे.

आणखी वाचा – Video : अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमधील व्हिडीओ समोर, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या चित्रीकरणाला सुरुवात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियांकाचा हा लूक पाहून तिचे चाहतेशी आश्चर्यचकित झाले आहेत. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये प्रियांका बरेलीमध्ये राहत असताना माझी आई तिला ओळखायची असंही या चाहतीने व्हिडीओद्वारे म्हटलं आहे.