होळीचा सण आला आणि काल धुळवड मोठ्या प्रमाणात साजरी झाली. मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली. बॉलीवूडमधील अनेक कलाकारांचे रंगपंचमी साजरी करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. बॉलीवूडचं लोकप्रिय कपल प्रियांका आणि निकनेसुद्धा काल होळीचा आनंद लुटला.

चोप्रा कुटुंबाने भव्य होळीची पार्टी आयोजित केली होती. प्रियांका आणि निक जोनासची लाडकी लेक मालतीची भारतातली ही पहिलीच धुळवड होती. होळीतील प्रियांका, निक आणि मालतीचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. यातल्या एका फोटोमध्ये प्रियांका तिचा मित्रपरिवार आणि कुटुंबाबरोबर दिसतेय. यात मालतीने सफेद रंगाचा ड्रेस आणि टोपी घातली आहे आणि प्रियांकाने आपल्या लेकीला कमरेवर उचलून घेतल आहे. मालती यात खूप गोड दिसतेय, तर प्रियांकाने सफेद रंगाचा चुडीदार ड्रेस घातला आहे. काल सगळ्याच कुटुंबाने होळीसाठी खास सफेद रंगाचे कपडे परिधान केले होते.

हेही वाचा… तरुणाईचा लाडका गायक आतिफ अस्लमने लेकीची दाखवली पहिली झलक; म्हणाला…

आणखी एका व्हायरल व्हिडीओत प्रियांका ढोलाच्या तालावर नाचताना दिसली. निकनेही यात आनंदाने सहभाग घेतला होता. गुलाबी रंगाने निक आणि प्रियांका माखलेले दिसत होते.

बिग बॉस फेम मन्नारा चोप्राही या पार्टीला हजर होती. मन्नाराने सफेद रंगाचं टी-शर्ट आणि डेनिम स्कर्ट परिधान केला होता. चोप्रा कुटुंबाच्या होळी सेलिब्रेशनचे फोटो प्रियांकाच्या एका फॅन पेजवरून व्हायरल झाले. “चोप्रा कुटुंबातर्फे होळीच्या हार्दिक शुभेच्छा”, असं कॅप्शन या पोस्टला दिलं गेलं होतं.

हेही वाचा… IPL सामन्यांतून ‘कोलकाता नाइट रायडर्स’ संघाचा मालक शाहरुख खान करतो कोटींची कमाई; जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रियांका चोप्रा लेक मालतीबरोबर भारतात आली होती. नंतर निकही भारतात आला. गेल्या आठवड्यात प्रियांका, निक आणि मालतीबरोबर अयोध्येला गेली होती. तिथले फोटो आणि व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला प्रियांकाला हजर राहता आले नसल्याने तिने सहकुटुंब राम मंदिराला भेट दिली आणि रामलल्लाचे दर्शन घेतले.