अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलीवूडसह हॉलीवूड चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता प्रियांका ग्लोबल स्टार म्हणून नावारुपाला आली आहे. परंतु, सुरुवातीच्या काळात बॉलीवूडमध्ये काम करताना अभिनेत्रीला अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. याबाबत प्रियांकाने अनेक मुलाखतींमध्ये भाष्य केलं आहे. हिंदी सिनेसृष्टीतील बरेच दिग्दर्शक अभिनेत्रींना कृत्रिमरित्या सौंदर्यात बदल करण्याचा अर्थात सर्जरी करण्याचा सल्ला देतात. असं तिने जुन्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. यावर आता ‘गदर २’ फेम दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी त्यांना आलेला अनुभव सांगितला आहे.

हेही वाचा : Video : “रब ने बना दी जोडी”, ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांचे जुने फोटो पाहिलेत का?, नेटकरी म्हणाले…

२००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या ‘गदर’च्या प्रचंड यशानंतर दिग्दर्शक अनिल शर्मांचा ‘हीरो: द लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला २००३ मध्ये आला. याविषयी अनिल शर्मा सांगतात,”प्रियांकाला माझ्या चित्रपटासाठी साइन करून मी परदेशी रवाना झालो होतो. तेव्हा तिच्या नाकावर शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रियांकाला चित्रपटासाठी साइन करून मी अमेरिका-युरोप दौऱ्यावर गेलो होतो. पुन्हा भारतात आल्यावर तिला ओळखणंही कठीण झालं होतं.”

हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीप प्रतापनं मुख्यमंत्र्यांच्या घरच्या बाप्पाचं घेतलं दर्शन; म्हणाला, “तोंडभरून कौतुक…”

अनिल शर्मा पुढे म्हणाले, “भारतात परतल्यावर मला चित्रपटाच्या निर्मात्यांनी तिचा फोटो दाखवला होता. तो फोटो प्रियांका चोप्राच्या सर्जरीनंतरचा होता. मला तेव्हा असं वाटलं की, प्रियांकाने स्वतःबरोबर असं का केलं असेल? मी तिला तिच्या आईसह ऑफिसमध्ये बोलावलं. तेव्हा प्रियांकाने तिने सायनसच्या त्रासामुळे सर्जरी केल्याचं सांगितलं. पण ती सर्जरी काही कारणास्तव व्यवस्थित झाली नव्हती.”

हेही वाचा : ‘हॅरी पॉटर’मधील ‘डंबलडोअर’ काळाच्या पडद्याआड, मायकेल गॅम्बॉन यांचे निधन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियांकाने या गोष्टींमुळे पुन्हा एकदा तिच्या मूळ गावी बरेलीत जाण्याचा निर्णय घेतला होता. काम मिळत नसल्याने ती इंडस्ट्री सोडून जाणार होती. अनेक प्रोजेक्ट्स तिच्या हातून निसटले. परंतु, अनिल शर्मांनी मोठी हिंमत दाखवत प्रियांकासा चित्रपटात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. “प्रसिद्ध मेकअप आर्टिस्टकडून मी प्रियांकाचा लूक बदलून घेतला, सर्जरीनंतरचे डाग या मेकअपमुळे दिसेनासे झाले. पुढे, चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रियांकाने साकारलेली व्यक्तिरेखा आणि तिचा लूक सर्वांच्या पसंतीस उतरला.” असं अनिल शर्मांनी सांगितलं.