Meera Chopra Wedding : प्रियांका चोप्रा व परिणीती चोप्रा यांची चुलत बहीण व लोकप्रिय अभिनेत्री मीरा चोप्रा लग्नबंधनात अडकली आहे. मीरा दिल्ली येथील केजरीवाल कुटुंबियांची सून झाली आहे. ४० वर्षीय मीराने जयपूरमध्ये बिझनेसमन रक्षित केजरीवालशी मंगळवारी (१२ मार्च रोजी) लग्नगाठ बांधली. मीराने तिच्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

मीराने या खास दिवसासाठी लाल रंगाचा पोशाख निवडला. लाल रंगाच्या लेहेंग्याबरोबर तिने मोठा नेकलेस घालून तिचा लूक पूर्ण केला. तर, नवरदेव रक्षितने पांढऱ्या रंगाची शेरवानी घातली होती. दोघेही लग्नात खूपच सुंदर दिसत होते. आनंद, भांडणं, हसणं, रडणं आणि आयुष्यभराच्या आठवणीत आता कायम सोबत असू, असं कॅप्शन मीराने फोटोंना दिलं आहे.

Video: चोप्रा कुटुंबाच्या नवीन जावयाला पाहिलंत का? प्रियांकाच्या बहिणीचा पती रक्षित केजरीवाल कोण आहे?

मीरा चोप्रा ही सुदेश व नीलम चोप्रा यांची लेक आहे. मीरा व रक्षित यांच्या लग्नाचे सर्व विधी बुएना व्हिस्टा लक्झरी गार्डन स्पा रेसॉर्टमध्ये पार पडले. या लग्नाला दोघांच्या कुटुंबियांव्यतिरिक्त फिल्म इंडस्ट्रीतील दिग्दर्शक मधुर भांडारकर, निर्माता संदीप सिंग, अभिनेता अर्जन बाजवा यांच्यासह इतर सेलिब्रिटी उपस्थित होते.

राखी सावंत बुरख्याच्या आत बिकिनी घालून…; फराह खानने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “तिच्याबरोबर काम करणं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहे रक्षित केजरीवाल?

रक्षित केजरीवाल चार्टर्ड अकाउंटंट आहे. त्याने कोलंबिया एज्युकेशन युनिव्हर्सिटीमधून फायनान्स आणि स्ट्रॅटेजीमध्ये एमबीए केलं आहे. २०१५ मध्ये रक्षितने SLAY कॉफी नावाची कंपनी उघडली. तो या कंपनीचा सहसंस्थापक आहे. त्याला शिक्षण आणि हवामानाशी संबंधित विषयांची खूप आवड आहे.