हिंदी चित्रपटसृष्टीत आजही अभिनेता आणि अभिनेत्री यांच्या मानधनात बरीच तफावत आहे. आज स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून जरी बरेच चित्रपट बनत असले तरी अभिनेत्यांपेक्षा अभिनेत्रींचं मानधन बरंच कमी असतं. याबाबत अभिनेत्री प्रियांका चोप्राने वक्तव्य केलं आहे. बीबीसीच्या ‘१०० यशस्वी महिलांच्या ‘ यादीत चार भारतीय महिलांपैकी एक नाव प्रियांकाचं आहे. प्रियांकाने बॉलिवूडप्रमाणेच हॉलिवूडमध्येही स्वतःचं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या दोन्ही चित्रपटसृष्टीत काम केल्याने प्रियांकाला या गोष्टीचा दांडगा अनुभव आहे. याविषयी बोलताना प्रियांका म्हणाली, “बॉलिवूडमध्ये काम करताना माझ्या बाबतीत मी कधीच समानता अनुभवली नाही. माझ्या पुरुष सहकलाकाच्या मानधनाच्या १०% कमी मानधनच मला नेहमी मिळालं आहे. बऱ्याच महिला कलाकारांना आजही या गोष्टीचा सामना करावा लागतो. हे आज माझ्या बाबतीतही घडू शकतं. आमच्या पिढीच्या अभिनेत्रींनी याबाबत सवाल केला आहे, पण या समस्येवर उपाय अजूनही मिळालेला नाही.”

आणखी वाचा : अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकचा व्हिडीओ आणि बल्बचं झुंबर; प्रसिद्ध दिग्दर्शकाची खोचक टिप्पणी

याबरोबरच बॉलिवूडमध्ये चित्रपटाच्या सेटवरील व्यवहार आणि एकूणच बॉलिवूडची कार्यप्रणाली यावरही प्रियांकाने टीका केली आहे. याबद्दल प्रियांका म्हणाली, “कित्येकदा आम्ही सेटवर नुसते बसून असायचो आणि सहकलाकार त्याच्या वेळेनुसार सेटवर यायचा आणि याबद्दल आम्ही कधीच एक शब्दही काढला नाही.” हॉलिवूडमध्ये काम करताना मात्र असा अनुभव आला नसल्याचंही प्रियांकाने स्पष्ट केलं आहे.

रुसो ब्रदर्स यांच्या आगामी साय-फाय सिरिज ‘सीटाडेल’मध्ये प्रियांका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ही वेबसीरिज प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच बऱ्याच वर्षांनी प्रियांका बॉलिवूड चित्रपटातही झळकणार आहे. फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात प्रियांका मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात प्रियांकाबरोबर आलिया भट्ट आणि कतरिना कैफ या अभिनेत्री झळकणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra tells her experience of work in bollywood and less payment for actress avn
First published on: 07-12-2022 at 12:01 IST