बॉलिवूडची अभिनेत्री आणि आता हॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा, लग्नानंतर ती अमेरिकेत स्थायिक झाली. आता तीन वर्षानंतर ती भारतात आली होती. मुंबईत आपल्या घरी राहिल्यानंतर तिने लखनऊ गाठले. भारतात आल्यावर तिने युनिसेफचं काम केलं. तिने लखनऊमधील युनिसेफच्या ऑफिसचा दौरा होता होता. यावेळी तिने उत्तर प्रदेशमधील महिलांच्या सुरक्षिततेबद्दल भीती व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युनिसेफ इंडियाची ॲम्बेसिडर असलेली प्रियांका तिच्या भारत दौऱ्यादरम्यान उत्तर प्रदेशमधील खेड्यांमध्ये फिरताना दिसली. तिथे तिने वेगवेगळ्या संस्थांना भेटी दिल्या. यावेळी तिने मुलांचं शिक्षण, त्यांच आरोग्य, पोषण तसंच सुरक्षिततेच्या बाबतीत सुरु असलेल्या आढावा घेतला. मुलांच्या प्रश्नांबरोबरच प्रियांकाने महिलांवरील अत्याचार आणि लैंगिक छळाविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी २४ तास कार्यरत असलेल्या कंट्रोल रूमला ही भेट दिली.

आणखी वाचा : “मी होकार दिला तो…”; अर्जुन कपूरबरोबर विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांवर मलायका अरोराचे स्पष्टीकरण

प्रियांकाने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओत ती महिला पोलीस अधिकाऱ्याशी संवाद साधताना दिसत आहे. प्रियांका त्यांना विचारते, “मला एक गोष्ट सांगा, मी देखील लखनऊमध्ये राहिले आहे. इथे एक प्रकारची भीती वाटते…खास करून संध्याकाळी सात वाजल्यानंतर…”

तिचे हे वाक्य ऐकताच त्या महिला पोलीस अधिकारी प्रियांकाला मध्येच थांबवतात आणि म्हणतात, “मी तुम्हाला डेटा दाखवते.” त्या तिला कंट्रोल रूममध्ये घेऊन जातात. कंट्रोल रूममधून कशा प्रकारे काम केलं जातं याची माहिती त्यांनी प्रियांकाला देतात. नव्या तंत्रज्ञानामुळे मदतकार्य सोपं आणि जलद झाल्याचं पाहून प्रियांकालाही समाधान वाटते.

हेही वाचा : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा तीन वर्षांनी मायदेशी परतण्यामागे ‘ही’ कारणं

हा व्हिडीओ शेअर करत प्रियांकाने लिहिलं, “भारतातील महिला आणि मुलांवर होणाऱ्या हिंसाचाराबद्दल भीतीमुळे बर्‍याच महिला आणि मुले तक्रार करत नाहीत. मला आशा आहे की अशा हेल्पलाईनमुळे ते करू शकतील. महिलांच्या सुरक्षेसाठी अजून बरेच काही करण्याची गरज आहे, परंतु असे उपक्रम ही एक चांगली सुरुवात आहे आणि जर ती प्रभावीपणे आमलात आणली गेली, तर भ्रष्टाचार आणि हिंसाचाराला नक्की आळा घालता येईल.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priyanka chopra visited 24 hours control room in lucknow rnv
First published on: 10-11-2022 at 20:09 IST