बॉलिवूडची देसी गर्ल आणि आता हॉलिवूड स्टार प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. प्रियांका तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टी तिच्या चाहत्यांसह शेअर करताना दिसते. पुन्हा एकदा देसी गर्ल तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये प्रियांकाने एका विशिष्ट गोष्टीच्या तस्करीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. प्रियांकाची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

सध्या मे महिना सुरू असल्याने प्रत्येकाला आब्याचे वेध लागले आहेत. याचसंदर्भात प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ आणि एक फोटो शेअर केला आहे. त्यात अभिनेत्री तिच्या लंडनच्या घरी शांतपणे बसून आंब्याचा मनसोक्त आस्वाद घेताना दिसत आहे. इंस्टा स्टोरीवर शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रियांका बाथरोब परिधान केला आहे. फोटोमध्ये प्रियांकाच्या हातात एक प्लेट आहे, ज्यामध्ये कापलेले आंबे ठेवले आहेत अन् प्रियांका आंब्याचा मनसोक्त आस्वाद घेत आहे.

आणखी वाचा : “द गॉडफादर हा अत्यंत टुकार चित्रपट आहे”; रॅपर हनी सिंगचा माफिया विश्वावरील चित्रपटांबद्दल मोठा खुलासा

या फोटोशिवाय प्रियांकाने एक बूमरँग व्हिडिओही शेअर केला आहे. त्यात पासपोर्टबरोबर एक आंबा ठेवलेला दिसतो आहे. या फोटोवर प्रियांकाने मस्करीत लिहिले आहे, की “आंब्याची तस्करी कायदेशीर आहे का? मी हे एका मित्रासाठी विचारत आहे.” प्रियांकाची ही इन्स्टा स्टोरी पाहून ती आंबा प्रेमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिचे हे फोटोज चाहत्यांना प्रचंड आवडले आहेत, बऱ्याच लोकांनी प्रियांकाचे कौतुकही केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
priyankachoprapost2
priyankachoprapost2
Priyankachoprapost1
Priyankachoprapost1

सध्या प्रियांका तिच्या आगामी ‘सिटाडेल’ या वेबसीरिजमुळे व्यस्त आहे. या अॅक्शन-थ्रिलरमध्ये ती रिचर्ड मॅडनसह मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही वेबसीरिज २८ एप्रिल २०२३ रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय प्रियांका चोप्रा ‘जी ले जरा’ या बॉलिवूड चित्रपटामुळेही खूप चर्चेत आहे. फरहान अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात प्रियांका प्रथमच आलिया भट्ट आणि कतरिना कैफसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.