दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांचा २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘विक्रम’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता कमल हासन दिग्दर्शक नाग अश्विनच्या ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहेत. कमल यांनी या चित्रपटातील भूमिकेसाठी जबरदस्त मानधन आकारलं असल्याचं समोर आलं आहे.
‘प्रोजेक्ट के’ हा मल्टीस्टारर चित्रपट आहे. या चित्रपटात प्रभासशिवाय अमिताभ बच्चन, दिशा पटानी, दीपिका पदुकोण आणि कमल हासन यांच्या महत्त्वाच्या भूमिका. हा इंडस्ट्रीतील सर्वात महागडा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. नाग अश्विन याचे दिग्दर्शन करत आहेत. दरम्यान, आता चित्रपटातील कलाकारांनी आकारलेल्या मानधनाचा आकडा समोर आला आहे.
हेही वाचा- “तिचा मृतदेह मी…”; राजपाल यादवने सांगितली पहिल्या पत्नीच्या निधनाची भयानक आठवण, म्हणाला…
प्रसिद्ध चित्रपट समीक्षक मनोबाला विजयबालन यांनी ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाच्या स्टारकास्टच्या फीबद्दल ट्विट केले आहे. ‘प्रोजेक्ट के’साठी प्रभासने १५० कोटी रुपये आकारल्याचे सांगण्यात येत आहेत. तर, कमल हासन यांनी २० कोटी रुपये, दीपिका पदुकोणने १० कोटी रुपये अमिताभ बच्चन आणि दिशा पटनीसह इतर कलाकारांनी २० कोटी रुपये घेतल्याची माहिती मिळाली आहे.
‘प्रोजेक्ट के’चे सायन्स फिक्शन चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे बजेट जवळपास ५०० कोटींच्या घरात आहे. चित्रपटाची निर्मिती वैजयंती मुव्हीज करत असून याचे संगीतकार संतोष नारायण आहेत. आता चित्रपटात कमल हासन यांच्या एन्ट्रीमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. हा चित्रपट १२ जानेवारी २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.