‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. पण या चित्रपटावरून वाद होताना दिसत आहे. या चित्रपटात नथुरामला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाल्यास चित्रपटगृहांसमोर निदर्शने करून चित्रपट बंद पाडण्यात येईल, असा इशारा अमर हुतात्मा हिंदू महासभेने दिला होता. त्यानंतर आता या चित्रपटाविरोधात लोकांनी मुंबईमध्ये आंदोलन केलंय. या चित्रपटाची निर्मिती राजकुमार संतोषी यांनी केली आहे.

Video: “मला…” राखी सावंतचं पोलिसांत तक्रार देणाऱ्या शर्लिन चोप्राला एका वाक्यात उत्तर

शुक्रवारी चित्रपट निर्माते चित्रपटाचे प्रमोशन करत असताना त्यांना काही लोकांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं. लोकांनी चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमात निर्मात्यांना काळे झेंडे दाखवले आणि जोरदार घोषणाबाजी केली. त्याठिकाणी विरोध इतका वाढला होता की निर्मात्यांना पोलिसांना बोलवावं लागलं. हा चित्रपट महात्मा गांधींना कमी लेखून त्यांचा मारेकरी नथुराम गोडसेचा गौरव करतो, असा आरोपी आंदोलकांनी केला. ‘न्यूज १८ हिंदी’ने याबद्दल वृत्त दिलंय.

नथुरामला खलनायक दाखवल्यास.. ‘गांधी गोडसे एक युद्ध’ चित्रपटाबाबत अमर हुतात्मा हिंदू महासभेचा गंभीर इशारा

‘गांधी गोडसे: एक युद्ध’ या चित्रपटाद्वारे राजकुमार संतोषी गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे गौरव करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. निर्मात्यांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही आणि शेवटी त्यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली.

रीना रॉयना पती मोहसिन खानने काढलेलं घराबाहेर; एक्स शत्रुघ्न सिन्हांनी थेट पाकिस्तानच्या राष्ट्रपतींना केलेला फोन

यासंदर्भात निर्मात्यांनी एक निवेदनही प्रसिद्ध केले आहे. प्रमोशन कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांना बोलावण्यात आल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. ‘गांधी गोडसे: एक युद्ध’ हा चित्रपट गोडसेचा गौरव करत नाही, असंही दिग्दर्शक, निर्माते राजकुमार संतोषी यांनी स्पष्ट केलंय.