बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी २०२० हे वर्ष खूपच कठीण गेलं. करोना काळात अनेक प्रोजोक्ट्स काम बंद पडलं, शूटिंग थांबवण्यात आलं. पण अभिनेत्री राधिका आपटेसाठी मात्र या सगळ्याच्या विरुद्ध होतं. करोनाच्या काळातही राधिकाकडे बरंच काम होतं आणि ती सातत्याने काम करत होती. ज्यामुळे तिच्या ज्ञानातही भर पडण्यास मदत झाली असं तिने नुकच्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. “या काळात मला जाणवलं की जवळपास १० वर्ष काम केल्यानंतर आता मी ब्रेक घेऊन माझा प्राधान्यक्रम ठरवायला हवा आणि नव्याने सुरुवात करायला हवी असं वाटलं.” असं राधिका ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

राधिका आपटे काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या हृतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या ‘विक्रम वेधा’ या चित्रपटात एका वकीलाच्या भूमिकेत दिसली होती. लवकरच तिचा ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ चित्रपट लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. पण आता राधिकाला फक्त एक अभिनेत्री म्हणून मर्यादित न राहता आणखी काही वेगळं करायचं आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत राधिकाने तिचा आगामी काळातील करिअर प्लान, वेगळं करिअर आणि एका विशिष्ट भूमिकेनंतर येणारा भूमिकांमधील एकसूरीपणा यावर भाष्य केलं.

आणखी वाचा- “मला सिरीयसली घ्या” असं का म्हणाली राधिका आपटे? अभिनेत्रीची इन्स्टा पोस्ट चर्चेत

राधिका आपटेला या मुलाखतीत, ‘जेव्हा तुम्ही एखादी भूमिका उत्तम पद्धतीने साकारता तेव्हा तुम्हाला पुढेही तशाच प्रकारच्या भूमिका ऑफर होतात. तूही यातून गेली आहेस. या सगळ्याचा कसा सामना केलास?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राधिका म्हणाली, “जेव्हा मी या इंडस्ट्रीत आले तेव्हा मला गावातली मुलगी किंवा साडी नेसणारी मुलगी अशा भूमिका मिळायच्या, पण ‘बदलापूर’नंतर मला अचानक सेक्स कॉमेडी असलेल्या भूमिका ऑफर केल्या जाऊ लागल्या, त्यानंतर मला थ्रीलर चित्रपट ऑफर होऊ लागले.”

राधिका पुढे म्हणाली, “आता मी फक्त ओटीटी सीरिज करत आहे असा लोकांचा समज आहे. प्रत्यक्षात मात्र मी दोनच ओटीटी सीरिज केल्या आहेत. तुम्हाला विशिष्ट कॅटेगरीसाठी ओळखलं जाणं ही गोष्ट खूपच मजेदार असते. अलिकडेच एका स्क्रिनिंगच्या वेळी एक व्यक्तीने मला सांगितलं, की आम्ही तुला नेटफ्लिक्सच्या प्रत्येक सीरिजमध्ये पाहिलं आहे. अर्थात लोकांच्याही काही कल्पना असतात ज्याचा वास्तवाशी काहीच संबंध नसतो. माझ्या बाबतीतही काहीसं असंच घडलंय.”

आणखी वाचा-“मला सेक्स कॉमेडी करण्यात…” चित्रपटांमध्ये काम करण्याबाबत अभिनेत्री राधिका आपटेचा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मुलाखतीत राधिकाने हेही स्पष्ट केलं की आगामी काळात ती काही निवडक प्रोजेक्ट करणार असून तिचा कल अभिनयाव्यतिरिक्त नवीन काहीतरी करण्याकडे आहे. सध्या ती स्क्रिप्ट रायटिंग शिकत आहे. करोनाच्या काळात केवळ अभिनय नाही त्याहून जास्त काही करता येईल अशी जाणीव आपल्याला झाल्याचं राधिकाने या मुलाखतीत स्पष्ट केलं.