बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा हे नेहमीच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असतात.
शिल्पा आणि राज हे फार कमी वेळा एकत्रितपणे फिरताना दिसले आहेत. नुकतीच एका नेटकऱ्याने राजला ट्वीटमधून खोचक प्रतिक्रिया दिली. त्यावरुन संतापलेल्या राजनेही त्याला जशास तसे उत्तर दिले आहे.

हेही वाचा : ‘अशी’ होती रिया चक्रवर्तीची तुरुंगातील वर्तणूक, बाहेर पडताना कैद्यांना वाटली मिठाई आणि…

राज आणि त्याची पत्नी शिल्पा हे अनेकदा ट्रोल होत असतात. आता शिल्पा शेट्टीमुळे राजला प्रसिद्धी मिळाली आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. त्यावरून त्याला अनेकदा टोमणेही मारण्यात येतात. आता शिल्पामुळे राजला प्रसिद्ध म्हणणाऱ्या ट्रोलर्सना त्याने खडे बोल सुनावले आहेत.

ट्विटरवर एका नेटकऱ्याने राजवर निशाणा साधला होता. त्याने लिहिले, “राज, तुला कोणी ओळखतही नाही तर तुला काय कोण ट्रोल करणार…तू तुझ्या बायकोमुळे प्रसिद्ध झाला आहेस.” त्यावर राजनेही त्याला चोख उत्तर दिले आहे. ट्रोलरच्या या ट्वीटवर उत्तर देत राजने लिहिले, “मी लोकांपासून माझा चेहरा लपवत नाही, मला मीडियाला माझ्यापर्यंत पोहोचू द्यायचे नाहीये. माझ्यावर केल्या गेलेल्या मीडिया ट्रायल्सनंतर हे समजणे सहाजिक आहे.”

हेही वाचा : पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर शिल्पा शेट्टीच्या पतीची छोट्या पडद्यावर एण्ट्री?, ‘या’ शोमध्ये होणार सहभागी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोर्नोग्राफी प्रकरणानंतर राज कुंद्रा घराबाहेर पडताना त्याचा चेहरा लपवतो. कधी मास्क तर कधी हटके पर्यायाचा वापर तो चेहरा लपवण्यासाठी करतो. परंतु या करवा चौथच्या वेळी मात्र चक्क त्याने चाळणीचा वापर केला. करवा चौथसाठी शिल्पा शेट्टीच्या चाळणीने चेहरा लपवत तो अनिल कपूर यांच्या घरी पोहोचला. त्याच्या या कृतीवरूनही त्याला ट्रोल करण्यात आले होते.