‘राजा हिंदुस्तानी’ हा आजवरच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. यातील जबरस्त गाणी, अफलातून अभिनय आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी पटकथा यामुळे हा चित्रपट सुपरहिट झाला होता. १९९६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील करिश्मा कपूर व आमिर खान यांचा किसिंग सीन प्रचंड गाजला होता. हा सीन आजही बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या किंसिंग सीन पैकी एक म्हणून ओळखला जातो.

“मी आणि काजोलने किसिंग सीन केला तेव्हा अजय देवगण…”, ‘द : ट्रायल’ फेम अभिनेत्याचा खुलासा

‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटातील या किसिंग सीनचे शूटिंग करणे खूप अवघड होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हा एक किसिंग सीन शूट करण्यासाठी आमिर खानला ४७ रिटेक घ्यावे लागले, तेही उटीच्या कडाक्याच्या थंडीत. हा संपूर्ण किस्सा करिश्मा कपूरने राजीव मसंदला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता.

“…भारतीय म्हणणं सोडून द्या”, रेणुका शहाणेंची मणिपूर घटनेवर प्रतिक्रिया; बॉलीवूड अभिनेत्रींनी व्यक्त केला संताप

मुलाखतीत करिश्मा म्हणालेली, “त्या किसिंग सीनसाठी आम्हाला खूप अडचणी आल्या होत्या. लोक नेहमी त्या किसिंग सीनबद्दल बोलतात. पण तो एक सीन शूट करायला आम्हाला ३ दिवस लागले, तेही फेब्रुवारीत, उटीच्या थंडीत. हा सीन कधी संपणार, अशी आमची अवस्था झाली होती. गोठवणाऱ्या थंडीत आम्ही सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत शूटिंग केले. शूटिंग करताना आम्ही थरथर कापत होतो. यामुळे त्यासाठी ४७ रिटेक घेण्यात आले होते.”

मणिपूरमध्ये महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून संतापला अक्षय कुमार; म्हणाला, “असे भयंकर कृत्य…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर किसिंग सीनमुळे वादात अडकला होता. पण चित्रपटाने दमदार कमाईही केली होती. ‘राजा हिंदुस्तानी’ हा त्या काळातील सुपरहिट चित्रपटांपैकी एक होता. ६ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने ७८ कोटींचा व्यवसाय केला होता.