सुप्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांनी २१ सप्टेंबर रोजी सकाळी दिल्ली येथील एम्स रुग्णालयामध्ये अखेरचा श्वास घेतला. राजू श्रीवास्तव यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण मनोरंजन विश्वासाला दुःखद धक्का बसला. तसेच संपूर्ण श्रीवास्तव कुटुंबीय कोलमडून गेलं. राजू श्रीवास्वत यांच्या निधनाला आता एक महिना पूर्ण झाला आहे. याचनिमित्त त्यांची पत्नी शिखा यांनी राजू श्रीवास्तव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. तसेच यावेळी त्या भावुक झाल्या.

आणखी वाचा – Video : प्लाझा चित्रपटगृहाबाहेरच झोपायचे सिद्धार्थ जाधवचे वडील, अभिनेत्याला रडू कोसळलं, म्हणाला, “टॉवरमध्ये घर…”

शिखा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये राजू श्रीवास्तव किशोर कुमार यांचं ‘धडकन का बंधन’ गाणं गाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून त्यांचे चाहतेही भावुक झाले आहेत. तसेच व्हिडीओमध्ये राजू श्रीवास्तव अगदी खूश दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

शिखा व्हिडीओ शेअर करताना म्हणाल्या, “तुम्हाला जाऊन महिना झाला. पण आम्हाला माहित आहे की तुम्ही इथे आमच्याबरोबरच आहात आणि कायम राहाल.” पुढे त्या म्हणाल्या, ” हे गाणं इतक्या लवकर प्रत्यक्षात अनुभवावं लागेल असं वाटलं नव्हतं.”

आणखी वाचा – वयाच्या ३१व्या वर्षी नशिबाने माझा नवरा हिरावून नेला पण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिखा यांनी राजू श्रीवास्तव यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला काही तासांमध्येच हजारो लाईक्स मिळाले आहेत. तसेच आम्ही तुम्हाला मिस करत आहोत, तुम्ही जिथे असाल तिथे खूश राहा अशा अनेक कमेंट त्यांच्या चाहत्यांनी हा व्हिडीओ पाहून केल्या आहेत.