अभिनेता हृतिक रोशन व सबा आझाद दोघेही मागच्या अनेक दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही एकमेकांच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसतात. अनेक पार्ट्यांमध्ये दोघेही एकत्र जातात, तसेच फॅमिली व्हॅकेशनवरही ते मुलांबरोबर जात असतात. त्यामुळे हे दोघंही लवकरच लग्न करणार असल्याची सध्या चर्चा आहे. या चर्चांवर हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूडमध्ये पुन्हा वाजणार सनई चौघडे; हृतिक रोशन आणि सबा आझाद अडकणार लग्नबंधनात?

एका व्हायरल पोस्टमध्ये हृतिक आणि सबा यावर्षी नोव्हेंबर महिन्यात लग्न करणार असल्याचा दावा करण्यात आला होता. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सबा व हृतिक खरंच लग्न करणार आहेत का? अशी चर्चा रंगली आहे. त्या रिपोर्टनुसार हृतिक अत्यंत साध्या पद्धतीने आणि कमी लोकांच्या उपस्थितीतच लग्न करणार असून लग्नानंतर दोघेही एका मोठ्या सुट्टीवर जाणार असल्याची चर्चा आहे. आता राकेश रोशन यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली.

View this post on Instagram

A post shared by Saba Azad (@sabazad)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘बॉलिवूड हंगामा’ने याबद्दल जाणून घेण्यासाठी हृतिक रोशनच्या वडिलांशी संपर्क साधला. राकेश म्हणाले, “मला तरी आतापर्यंत याबाबत माहिती नाही.” तर, त्यांनी हृतिकच्या जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने याबद्दल माहिती दिली आहे. “त्या दोघांना त्यांचं नातं फुलवायला वेळ द्या. मैत्री झाली की लग्नाच्या गोष्टी सुरू. हृतिक प्रेमात असला तरी लहान नाही, त्याला मुलं आहेत आणि त्याच्यावर मुलांची जबाबदारी आहे,” असं त्या सूत्रांनी म्हटल्याचं वृत्त दिलं आहे.