बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन(Hrithik Roshan)ने २००० साली ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट दिग्दर्शक राकेश रोशन (Rakesh Roshan) यांनी म्हणजेच हृतिकच्या वडिलांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट बनवताना राकेश रोशन यांनी त्यांचे घर गहाण ठेवले होते. मात्र, ही गोष्ट त्यांनी हृतिक रोशनला कळू दिली नव्हती. आता एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल खुलासा केला आहे.

‘ना तुम जानो ना हम’ या गाण्याचे शूटिंग…

राकेश रोशन यांनी नुकतीच मिड-डेला मुलाखत दिली. या मुलाखतीत राकेश रोशन यांनी म्हटले, “मला कराबी आयलँडबद्दल माहीत झाले होते, जिथे समुद्रात दगड आहेत, जेथील पाणी निळ्या रंगाचे दिसते; तिथे शूटिंग करणे माझे स्वप्न होते. न्यूझीलंडमध्ये असणाऱ्या ख्रिस्तचर्च आणि क्वीन्सटाऊनसारख्या ठिकाणी मला ‘ना तुम जानो ना हम’ या गाण्याचे शूटिंग करण्याचे माझे स्वप्न होते. एक दिग्दर्शक, निर्माता म्हणून अशा प्रकारचे शूटिंग करण्याचे माझे स्वप्न होते, त्यामुळे मी स्वत:ला संधी द्यायचे ठरवले.”

पुढे राकेश रोशन यांनी म्हटले की, जेव्हा मला घर गहाण ठेवण्याची कल्पना सुचली तेव्हा मी माझी पत्नी पिंकीला याबद्दल सांगितले. हृतिकला याबद्दल काहीच माहीत नव्हते. फक्त माझ्या पत्नीला याबद्दल माहीत होते. मी तिला सांगितले मी घर गहाण ठेवत आहे, जर मला पैशांची गरज लागलीच तरच मी पैसे घेईन नाहीतर माझ्याकडे जे फंड आहेत, त्यातून मी खर्च सांभाळण्याचा प्रयत्न करेन. जर चित्रपट चालला नसता तर दुसरीकडे जावे लागले असते. पण, मी स्वत:ला ती संधी देण्याचे ठरवले.

याबरोबरच राकेश रोशन यांनी याच मुलाखतीत ‘कामचोर’ चित्रपटातील ‘तुज संग प्रीत लगाई’ हे गाणे शूट करण्यासाठी त्यांनी त्यांची मर्सिडीज गहाण ठेवली होती, अशी आठवण सांगितली. ते गाणे शूट करण्यासाठी त्यांना दोन लाख रुपयांची गरज होती, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. राकेश रोशन यांनी म्हटले की मी त्यावेळी विचार केला की, हे गाणे इतके सुंदर आहे की उटी किंवा काश्मीरमधील सुंदर ठिकाणी या गाण्याचे शूटिंग झाले पाहिजे. त्यामुळे दोन लाखांसाठी मी माझी गाडी गहाण ठेवली. मी विचार केला की हे सोपे आहे. जर मी चांगला चित्रपट बनवला तर तो लोकांना आवडेल. तशीच रिस्क मी ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटावेळी घेतली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. हृतिक रोशनचे या चित्रपटासाठी कौतुक झाले होते. याबरोबरच राकेश रोशन यांनी अनेक मुलाखतींमध्ये ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटानंतर त्यांच्यावर जो गोळीबार झाला होता, त्याबद्दल वक्तव्य केले आहे. अंडरवर्ल्डकडून हा हल्ला करण्यात आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.