राखी सावंत व तिचा पती आदिल खान यांच्यामधील वाद गेल्या बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. राखीने आदिलवर फसवणूक व मारहाणीसारखे गंभीर आरोप केले. त्याचबरोबरीने त्याचं दुसऱ्याच मुलीबरोबर अफेअर असून तिच्याशी आदिलने लग्न केलं असल्याचंही राखीने सांगितलं. राखीच्या तक्रारीनंतर ओशिवारा पोलिसांनी आदिलला ७ फेब्रुवारीला अटक केली. अजूनही या दोघांमधील वाद सुरू आहे.

आणखी वाचा – सैफ अली खानचं लग्न झाल्यावर लेकापासून विभक्त राहू लागल्या शर्मिला टागोर, म्हणाल्या, “आईला गृहित धरलं जातं कारण…”

एकीकडे आदिल तुरुंगात असताना दुसरीकडे राखी त्याच्यावर सातत्याने आरोप करत आहे. दरम्यान राखीचे नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आताही तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती रस्त्यावर बसून रडताना दिसत आहे. तसेच माझं आयुष्यच उद्धवस्त झाल्याचं ती बोलत आहे.

पापाराझी छायाचित्रकारांनी राखीला घेरताच ती रस्त्यावर बसते. रडत म्हणते, “त्या मुलीचे ऑडिओ व व्हिडीओ आज आले आहेत. देवा माझ्यावर थोडीतरी दया कर. माझं घर तोडलं. राखी सावंतला रस्त्यावर आणलं. माझ्यासारख्या खंबीर मुलीला हा कसा फसवू शकतो याचाच मी विचार करत आहे. माझं आयुष्य का उद्धवस्त केलं?”.

आणखी वाचा – Video : “लोकांना का त्रास देता?” अमृता फडणवीसांनी शेअर केला ‘शिव तांडव स्तोत्रम्’ गातानाचा व्हिडीओ, नेटकऱ्यांना संताप अनावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आदिल खानला अटक केल्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर १६ फेब्रुवारीला आदिलला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सोमवारी(२० फेब्रुवारी) पुन्हा आदिलची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.