ड्रामा क्वीन राखी सावंत गेले काही दिवस परदेशात होती. तिने दुबईमध्ये स्वतःची अॅक्टिंग अकॅडमी सुरू केली आहे. त्यानिमित्ताने ती दुबईमध्ये होती. पण आता ती भारतात परतली आहे. मायदेशी परतल्यानंतर पुन्हा एकदा राखी सावंद भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. पती आदिल खानची आठवण काढत राखीच्या डोळ्यात अश्रू तरळले.

Video: शो नक्की कुणाचा? MC Stan च्या कॉन्सर्टमध्ये सेल्फीसाठी चाहत्यांचा गराडा; शिव ठाकरे गर्दीचा व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

“दुबईमध्ये स्वतःची अकॅडमी सुरू केली आहे. तसेच मी तिथे एक घर व गाडीही घेतली आहे,” असं राखी माध्यमांशी बोलताना म्हणाली. पण पुढच्याच क्षणी ती रडू लागली आणि “ही तीच जागा आहे ना, जेव्हा मी आदिलबरोबर इथं आले होते. मी आणि आदिल दुबईवरून परत आलो होतो, तेव्हा इथेच फुलांचा वर्षाव करण्यात आला होता. पण, त्याने ते सर्व नाटक असल्याचं त्याच्या गर्लफ्रेंडला सांगितलं होतं,” असं म्हणत राखीच्या डोळ्यांत पाणी आलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राखीच्या या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी कमेंट्स करत सहानुभूती व्यक्त केली आहे व आदिलने तिची फसवणूक केल्याबद्दल त्याच्यावर टीका केली. तर, काही जण मात्र राखीला ट्रोल करताना दिसून आले.