अभिनेत्री राखी सावंतवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राखी सावंतची आई जया यांचं शनिवारी संध्याकाळी निधन झालं. मागच्या बऱ्याच काळापासून त्या कॅन्सर आणि ब्रेन ट्यूमरशी झुंज देत होत्या. मात्र शनिवारी संध्याकाळी मुंबईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राखी सावंतने स्वतः या वृत्ताची पुष्टी केली आहे. आईच्या अखेरच्या दिवसांमध्ये राखी तिच्याबरोबर होती. पण त्यांच्या निधनानंतर राखीची अवस्था खूपच बिकट झाली आहे. आईच्या निधनानंतर या दुःखाच्या क्षणी राखी सावंतला सलमान खानची आठवण आली आहे.

२८ जानेवारीला राखी सावंतच्या आईने मुंबईतील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर राखी सावंतवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियावर राखी सावंतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात राखी सावंत आईचं पार्थिव रुग्णालयातून नेताना ढसाढसा रडताना दिसत आहे. यावेळी ती सलमान खानचंही नाव घेताना दिसत आहे. “सलमान भाई आई गेली” असं ती पुन्हा पुन्हा बोलताना दिसत आहे.

आणखी वाचा- निधनाआधी खूपच वेदनादायी होती राखीच्या आईची अवस्था, अखेरच्या क्षणांचा रुग्णालयातील व्हिडीओ आला समोर

मीडिया रिपोर्टनुसार मागच्या तीन वर्षांपासून राखी सावंतची आई जया ब्रेन ट्यूमर आणि कॅन्सरशी झुंज देत होत्या. त्यांचा कॅन्सर किडनी आणि फुफ्फुसांपर्यंत पोहोचला होता. अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली होती अखेर त्यांनी शनिवारी संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. या दरम्यान राखी सावंतला आईच्या उपचारांसाठी मुकेश अंबानी आणि सलमान खान यांनी खूप मदत केली होती.

आणखी वाचा- आईच्या निधनानंतर राखी सावंतचा आक्रोश, व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राखी सावंत सलमान खानचा खूप आदर करते. बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानने राखीला तिच्या कठीण काळात खूप मदत केली आहे. तिच्या आईच्या उपचारांसाठी त्याने आर्थिक मदतही केली होती. याशिवाय काही दिवसांपूर्वी राखीच्या खासगी आयुष्यात लग्नावरून झालेला गोंधळ सोडवण्यासाठीही सलमानने मदत केल्याचं राखीने सांगितलं होतं.