पती आदिल खानने केलेली फसवणूक आणि मारहाण यामुळे राखी सावंत काही दिवस खूपच चर्चेत होती. तिच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळानंतर तिने एका गाण्यासाठी शूटिंग केलं होतं. तिचं ते गाणं आता प्रदर्शित झालं आहे. ‘झुठा’ असं या गाण्याचं नाव आहे.
राखी सावंतचं ‘झुठा’ हे गाणं आज प्रदर्शित झालं आहे. काही दिवसांपूर्वीच या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर आज गाणंही प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. राखीचं हे गाणं रिलीज होऊन दोन तास झाले आहेत. दोन तासांत या गाण्याला १७ हजार व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच हे गाणं राखीच्या खऱ्या आयुष्यावर आधारित आहे, अशा प्रकारच्या कमेंट्स लोकांनी केल्या आहेत.
हे गाणं अल्तमाश फरिदीने गायलं असून राखीसह सलमान शेखने यामध्ये मुख्य कलाकार म्हणून काम केलं आहे. या गाण्याची निर्मिती व दिग्दर्शन कोरिओग्राफर मुदस्सर खानने केलं आहे.