अभिनेत्री राखी सावंत तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. राखीने पती आदिलविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर आता आदिल १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे.

काही दिवसांपूर्वीच राखीच्या आईचं निधन झालं. राखीने व्हॅलेंटाइन डेला तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन आईचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवर राखीच्या एका चाहत्याने तिचा पूर्वाश्रमीचा पती रितेशवरुन कमेंट केली होती. “राखी रितेशपासून दूर राहा. हे बरोबर नाही”, अशी कमेंट चाहत्याने केली होती. पहिल्या पतीबाबत कमेंट करणाऱ्या चाहत्याला राखीने उत्तर दिलं आहे.

हेही वाचा>> सुकेश चंद्रशेखरकडून नोरा फतेहीचा ‘गोल्ड डिगर’ असा उल्लेख, म्हणाला…

हेही वाचा>> सुकेश चंद्रशेखरकडून जॅकलिन फर्नांडिसला ‘व्हॅलेंटाइन डे’च्या शुभेच्छा, म्हणाला “तुम्ही ज्याच्यावर…”

“तो फक्त माझा मित्र आणि हितचिंतक आहे”, असा रिप्लाय राखीने कमेंट करणाऱ्या चाहत्याला दिला आहे. राखीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. राखी ‘बिग बॉस १५’ मध्ये सहभागी झाली होती. तेव्हा तिने ‘बिग बॉस’च्या घरात रितेश पांडेची पती म्हणून ओळख करुन दिली होती. परंतु, नंतर रितेश विवाहित असल्याचं समोर आलं होतं.

rakhi sawant news

हेही वाचा>> “…म्हणून मी अर्चना गौतमला शेंबडी म्हणायचो”, एमसी स्टॅटने सांगितलं खरं कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राखी सावंत व आदिल खानने मे २०२२ मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर पडताच राखीने याचा खुलासा केला होता. त्यानंतर राखीने आदिलवर मारहाण, फसवणूक असे गंभीर आरोप केले होते.