डिसेंबर महिन्यात आदिलबरोबर लग्नाचा खुलासा करणारी राखी सावंत सध्या त्याच्यावर मारहाणीसह गंभीर आरोप करताना दिसत आहे. राखीच्या आरोपांनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आणि कोर्टात हजर केलं. कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आदिल कोठडीत गेल्यानंतरही राखीचे आरोप आणि ड्रामा संपताना दिसत नाही.

“मी आदिलसाठी धर्मांतर केल्याचं कळताच आईने…” राखी सावंतने केला खुलासा

राखी सावंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती ‘माझ्याबरोबर देव आहे, मला देवावर विश्वास आहे’, असं म्हणताना दिसत आहे. यावेळी तिने तिच्या मैत्रिणीचा हात पकडला आहे. ‘मेरे साथ खुदा खडा है’, असं म्हणत ती मागे वाकते आणि पुन्हा उभी होते. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.

सुपरहिट चित्रपटातून पदार्पण, आईबरोबर अफेअरची अफवा अन् घटस्फोट! ‘आशिकी’ फेम अभिनेत्याचा हिरो ते झिरो प्रवास

राखीच्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करून तिला ट्रोल करत आहेत. ‘राखीच्या ड्रामावर तिची मैत्रीणही हसत आहे’. ‘राखीला काम मिळत नसल्याने ती रस्त्यावर असा ड्रामा करत फिरते’. ‘दोन दिवसांनी ती तिच्या मैत्रिणीवरही गुन्हा दाखल करेल’, ‘राखी आता थांबव गं ड्रामा, गेला एक महिना सातत्याने रस्त्यावर तुझा ड्रामा सुरू आहे’, ‘अरे कोणीतरी हिला आवरा, जर तिच्यासोबत काही चुकीचं झालंय तर तिने कोर्टावर विश्वास ठेवावा, दर तासाला रस्त्यावर येऊन ड्रामा का करते ही’? असं एका युजरने म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, राखी सावंतने आठ महिन्यांपूर्वी कुणालाही न सांगता आदिल खानशी इस्लाम पद्धतीने लग्न केलं होतं. त्यासाठी तिने फातिमा नावही स्वीकारलं होतं. नंतर मात्र आदिलच्या अफेअरबद्दल कळताच तिने त्याच्यावर गंभीर आरोप केले आणि सध्या तो कोठडीत आहे.