बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तेलुगु अभिनेत्री आशू रेड्डीच्या पायाला किस करतानाचा राम गोपाल वर्माचा फोटो व्हायरल झाला होता. यामुळे त्याला ट्रोलही करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा वर्माने त्यासंदर्भात ट्वीट केलं आहे.

राम गोपाल वर्माने आशू रेड्डीला मुलाखत दिली होती. ‘डेंजरस’ या चित्रपटाच्या प्रमोशनकरिता तो आशू रेड्डीच्या शोमध्ये सहभागी झाला होता. या मुलाखती दरम्यान वर्माने अभिनेत्रीच्या पायाला किस केलं आणि त्यानंतर तिचा पाय चोखलाही होता. राम गोपाल वर्माने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन या मुलाखतीचा संपूर्ण व्हिडीओ शेअर केला होता. अभिनेत्रीच्या पायाला किस करतानाचे फोटो व्हायरल झाल्याने तो चर्चेतही आला होता. आता पुन्हा एकदा त्याच्या ट्वीटने लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा>> Rajinikanth Birthday Special: ३५ कोटींचा बंगला, महागड्या कार अन्…; सुपरस्टार रजनीकांत यांची एकूण संपत्ती माहितीये का?

राम गोपाल वर्माने ट्वीटमध्ये ‘डेंजरस’ चित्रपटातील अप्सरा राणीचा तिच्या कुत्र्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोबरोबर त्याने आशू रेड्डी व त्याचा फोटोही पोस्ट केला आहे. “आशू रेड्डीच्या पायाजवळ बसल्यानंतर मला ज्या भावना जाणवल्या त्या मी अप्सरा राणीच्या कुत्र्याकडून शिकलो आहे” असं म्हणत त्याने ट्वीटमध्ये कुत्र्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटही शेअर केलं आहे.

हेही वाचा>>“मी काश्मीरचा…” नावावरुन झालेलं चाहत्याचं कन्फ्युजन गश्मीर महाजनीने स्वत:च केलं दूर

हेही वाचा>>सिद्धार्थ शुक्लाच्या वाढदिवशी शहनाज गिल भावूक, पोस्ट शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेत्रीच्या पायाला किस केल्यानंतर आता राम गोपाल वर्माच्या या ट्वीटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या ट्वीटमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.