Raha Kapoor Video : रणबीर कपूर आणि आलिया भट्टची लेक राहा कपूर सध्या सर्वाधिक चर्चेत असणारी स्टार किड्स झाली आहे. राहाचा गोड अंदाज नेहमी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतो. राहाचा आता वेगळा चाहता वर्ग तयार झाला आहे. नुकतीच राहा आई-बाबा रणबीर-आलियाबरोबर मुंबई विमानतळावर पाहायला मिळाली. यावेळी राहाच्या एका कृतीमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

रणबीर कपूर आणि आलिया भट्टची लाडकी राहा दोन वर्षांचा झाली आहे. अलीकडेच ख्रिसमसच्या दिवशी राहा पापाराझींना शुभेच्छा देताना दिसली. यावेळी पापाराझींसमोर येताच ‘हाय, मेरी ख्रिसमस’ असे राहाचे बोबडे बोल ऐकायला मिळाले. त्यानंतर पापाराझींचा निरोप घेताना राहाने पहिल्यांच बाय केलं आणि फ्लाइंग किस दिली. याचे फोटो, व्हिडीओ अजूनही चर्चेत आहेत. अशातच राहाचे मुंबई विमानतळावरील व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा – Video: पत्नीच्या वाढदिवसानिमित्त ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची खास पोस्ट; किती वर्षांची झाली प्राजक्ता? म्हणाला…

नवीन वर्षाच्या निमित्ताने कपूर कुटुंब परदेशात जात आहे. शुक्रवारी रणबीर, आलिया राहाबरोबर न्यू इअर सेलिब्रेशनसाठी परदेशात जाताना पाहायला मिळाले. मुंबई विमातळावर मायलेकी मॅचिंग कपड्यांमध्ये तर रणबीर निळ्या रंगाचा शर्ट, जीन्समध्ये दिसला. यावेळी सर्व पापाराझींनी राहाला आवाज दिला. तेव्हा राहा पापाराझींना ‘बाय-बाय’ करताना दिसली. लेकीची ही कृती पाहून रणबीर, आलिया हसू लागले. त्यानंतर राहाने सर्व पापाराझींना फ्लाइंग किस दिली. हे पाहून आलिया पुन्हा जोरजोरात हसू लागली. राहा या गोड अंदाजामुळे चर्चेत आली आहे.

हेही वाचा – Year Ender 2024: ऑस्कर ते कान, गोळीबार ते जेल; वाचा २०२४मधील सिनेसृष्टीतील टॉप-११ बातम्या

राहा कपूरच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं, “राहा खूप गोड आहे.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, व्हिडीओमध्ये राहा आपल्या पालकांपेक्षा मोठी स्टार वाटतं आहे. तर तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “राहा बॉलीवूडची सर्वात जास्त गोड मुलगी आहे.”

हेही वाचा – वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’ची निराशाजनक कामगिरी, १८० कोटी बजेट असलेल्या सिनेमाने ३ दिवसांत कमावले फक्त…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रणबीर कपूर आणि आलिया भट्टचं २०२२ मध्ये लग्न झालं. त्यानंतर त्याचवर्षी ६ नोव्हेंबरला आलियाने राहाला जन्म दिला होता. दोघांनी वर्भभर राहाचा चेहरा लपवला. गेल्या वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर रणबीर आणि रणबीरने राहाची पहिली झलक दाखवली. तेव्हापासून राहाचे गोड व्हिडीओ नेहमी व्हायरल होतं असतात.