आलिया भट्ट व रणबीर कपूर आई-बाबा झाले असल्याचं समजताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भट्ट व कपूर कुटुंबीय सध्या आलियाच्या लेकीच्या आगमनाची तयारी करत आहेत. दोन्ही कुटुंबामध्ये उत्साहाचं तसेच आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. भट्ट व कपूर कुटुंबातील मंडळींनी सोशल मीडियाद्वारे खास पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला. रणबीरचा आनंद तर गगनात मावेनासा झाला आहे. लेकीला पहिल्यांदाच उचलून घेतल्यानंतर रणबीरची प्रतिक्रिया नेमकी काय होती? हे आता समोर आलं आहे.

आणखी वाचा – आलिया भट्ट व रणबीर कपूर झाले आई-बाबा अन् चर्चेत आला करण जोहर, मीम्स पाहून तुम्हालाही हसू होईल अनावर

आलिया-रणबीर यांच्या नव्या आयुष्याला आता सुरुवात झाली आहे. आपल्याला मुलगीच हवी आहे असं रणवीरने मुलाखतीमध्येही म्हटलं होतं. त्याची ही इच्छा आता पूर्ण झाली आहे. जेव्हा रणवीरने आपल्या लेकीला पहिल्यांदाच पाहिलं तेव्हा तो अगदी भावूक झाला.

‘बॉलिवूड लाइफ’च्या वृत्तानुसार, कपूर कुटुंबीयांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं की, जेव्हा रणबीरने आपल्या मुलीला पहिल्यांदाच पाहिलं तेव्हा तो खूप खुश होता. तसेच संपूर्ण कपूर कुटुंबिय त्याक्षणी आनंदात होतं. पण रणबीरने आपल्या लेकीला पाहिल्यानंतर तो स्वतःला सावरू शकला नाही.

आणखी वाचा – “दोन वेळा आत्महत्या करण्याचा…” समीर चौगुलेंना चाहतीने भर कार्यक्रमामध्ये दिली चिठ्ठी, नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आनंदाच्या भरामध्ये रणबीर रुग्णालयामध्येच लेकीला पाहता रडू लागला. त्याला यावेळी अश्रू अनावर झाले. रणबीरला रडताना पाहून तिथे उपस्थित कुटुंबियांच्या डोळ्यांमध्येही पाणी आलं. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचं लग्न १४ एप्रिल २०२२ रोजी मुंबईत झालं. आता रणबीर सध्या बाबा झाला असल्याचे सुंदर क्षण जगत आहे.