बॉलीवूडमधील सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या काही कलाकारांमध्ये आलिया भट्ट(Alia Bhatt), रणबीर कपूर(Ranbir Kapoor), विकी कौशल यांची नावे घेतली जातात. आलिया भट्ट व रणबीर कपूर यांनी लग्न केले आहे. त्यामुळे हे सेलेब्रिटी जोडपे त्यांच्या व्यावसायिक आयुष्यामुळेदेखील मोठ्या चर्चेत असते. त्यांची मुलगी राहादेखील सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसते. आता आलिया भट्टने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आलिया भट्टने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला. त्या व्हिडीओमध्ये आलियाच्या हातात एक पोस्टर असल्याचे पाहायला मिळत आहे. आलिया भट्ट म्हणते, “मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. माझे सर्वांत आवडते अभिनेते लवकरच एकत्र किंवा एकमेकांच्या विरुद्ध दिसणार आहेत.” त्यानंतर ती तिच्याजवळ असलेले पोस्टर दाखवते. त्यामध्ये आमिर खान आणि रणबीर कपूर दिसत आहेत. या पोस्टरवर या वर्षातील सर्वांत मोठं शत्रुत्व, असे म्हटले आहे. विशेष बाब म्हणजे रणबीर कपूरचा रामायण या चित्रपटाचा दिग्दर्शक नितीश तिवारी या नवीन प्रोजेक्टचेदेखील दिग्दर्शन करणार आहे.

आलिया भट्टने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये रणबीर कपूर आणि आमिर खान कोणत्या प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत, याचा खुलासा केला. हे दोन लोकप्रिय अभिनेते एका जाहिरातीत एकत्र काम काम करणार असल्याचे आलियाने म्हटले. अभिनेत्रीने म्हटले, “सर्वोत्तम कलाकारांची लढाई. माझे दोन आवडते कलाकार एकमेकांविरुद्ध असतील. त्याबद्दल अधिक माहिती उद्या समोर येणार असल्याचे आलियाने म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt ? (@aliaabhatt)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणबीर कपूर आणि आमिर खानने याआधीही एकत्र काम केले आहे. आमिर खानच्या गाजलेल्या पीके या चित्रपटात रणबीर कपूरने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटात आमिर खानसह अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळाले. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या कामाबद्दल बोलायचे, तर ते लवकरच संजय लीला भन्साळी यांच्या लव्ह अँड वॉर या चित्रपटात दिसणार आहेत. त्यामध्ये विकी कौशलही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. विकी कौशलचा नुकताच प्रदर्शित झालेल्या छावा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळत आहे. आमिर खानच्या आगामी काळातील चित्रपटाबद्दल बोलायचे, तर तो लवकरच सितारे जमीन पर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.