रणबीर कपूर आणि आलिया भट्टची लेक राहा ( Raha Kapoor ) सध्याची बहुचर्चित स्टारकिड्स आहे. त्यामुळे राहाचा प्रत्येक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतो. राहा कधी पापाराझींना बाय, बाय करताना, तर कधी फ्लाइंग किस देताना दिसते. दोन वर्षांच्या चिमुकल्या राहाच्या या गोड अंदाजाचा आता मोठा चाहता वर्ग तयार झाला आहे. नुकतंच या चिमुकल्या राहाने एका खास व्यक्तीचा फोटो काढला. याची सध्या चर्चा रंगली आहे. तसंच राहाने काढलेला हा फोटो व्हायरल झाला आहे.

राहा कपूरने ( Raha Kapoor ) आई-बाबा म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा नाही तर एका खास व्यक्तीचा फोटो काढला आहे. या फोटोमधून चिमुकल्याचा राहाच्या फोटोग्राफीचं कौशल्य पाहायला मिळत आहेत. आलिया, रणबीरच्या लेकीने मावशी शाहीन भट्टचा फोटो काढला आहे. शाहीन भट्टने राहाने काढलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत शाहीनने कॅमेराचा इमोजी शेअर करत राहा असं लिहिलं आहे.

शाहीन भट्टचा हा फोटो पाहून नेटकरी राहाच्या ( Raha Kapoor ) फोटोग्राफी कौशल्याचं कौतुक करत आहेत. तर काहींनी म्हटलं आहे की, राहा वडील रणबीरच्या पावलावर पाऊल ठेऊन चालत आहे.

View this post on Instagram

A post shared by Shaheen Bhatt (@shaheenb)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोव्हेंबर महिन्यात राहाच्या ( Raha Kapoor ) वाढदिवसानिमित्ताने शाहीन भट्टने तिच्याबरोबर खूप सुंदर फोटो शेअर केले होते. तिची ही पोस्ट खूप व्हायरल झाली होती. दरम्यान, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट २०२२मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यानंतर त्याचवर्षी ६ नोव्हेंबरला आलियाने राहाला जन्म दिला होता. दोघांनी वर्भभर राहाचा चेहरा लपवला. गेल्या वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर रणबीर आणि रणबीरने राहाची पहिली झलक दाखवली. तेव्हापासून राहाचे गोड व्हिडीओ नेहमी व्हायरल होतं असतात.