अभिनेत्री रानी मुखर्जी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सार्वजनिकरित्या फार बोलत नाही. पण आता तिने एक खुलासा केला आहे. रानीचा तीन वर्षांपूर्वी गर्भपात झाला. तिने करोना काळात तिचं दुसरं बाळ गमावलं. रानी दुसऱ्यांदा आई होणार होती, पण पाचव्या महिन्यात तिचा गर्भपात झाला, असं तिने सांगितलं आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडेवर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांचे निधन

मेलबर्नच्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये राणी मुखर्जीने २०२० मध्ये तिचा गर्भपात झाल्याचा खुलासा केला. त्यावेळी ती पाच महिन्यांची गरोदर होती. तिने ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ च्या प्रमोशन दरम्यान तिच्या आयुष्यातील या दुःखद घटनेचा अजिबात उल्लेख केला नाही, कारण लोकांना हा पब्लिसिटी स्टंट वाटला असता, असंही तिने सांगितलं.

सीमा हैदरला चित्रपटात काम देण्यावरुन मनसे आक्रमक; अमेय खोपकर म्हणाले, “हे असले तमाशे…”

मेलबर्नमध्ये राणी मुखर्जी म्हणाली, “मी पहिल्यांदाच माझ्या आयुष्याबद्दल अशा प्रकारे सार्वजनिकपणे बोलत आहे. ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’च्या प्रमोशनच्या वेळीही मी माझ्या वेदना लोकांसमोर व्यक्त केल्या नाहीत. कारण लोकांनी माझे वैयक्तिक आयुष्य चित्रपटाशी जोडले असते आणि मी हे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी करत असल्याचं त्यांना वाटलं असतं, जे मला नको होतं. कोविड १९ च्या वेळी म्हणजे २०२० मध्ये मी गरोदर होते. आम्ही दुसऱ्यांदा पालक होणार होतो. पण दुर्दैवाने मी माझे ५ महिन्यांचे बाळ गमावले. माझा गर्भपात झाला.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राणीने सांगितले की या दुःखद घटनेनंतर दहा दिवसांनी तिला ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’साठी निखिल अडवाणीचा फोन आला. पण रानीच्या गर्भपाताबद्दल त्याला आणि दिग्दर्शक आशिमा छिब्बर दोघांनाही कल्पना नव्हती. तिने या चित्रपटाला होकार देण्यामागच्या कारणाचाही खुलासा केला. “चित्रपटाची ऑफर आली, तेव्हाच मी माझं बाळ गमावलं होतं. माझ्याही भावना चित्रपटातील आईशी मिळत्या-जुळत्या होत्या, त्यामुळे मी हा चित्रपट स्वीकारला,” असं रानीने सांगितलं.