रणवीर सिंग व दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. या जोडीचे लाखो चाहते आहेत. रणबीर-दीपिका अनेकदा एकमेंकाबद्दल असलेलं प्रेम कार्यक्रमात, सोशल मीडियावरील पोस्टमधून व्यक्त करताना दिसतात. आताही दीपिकाच्या पोस्टवरील रणवीरच्या कमेंटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. ग्लॅमरस लूकमधील दीपिकाचा फोटो आणि ही वेळ पूर्वेकडे बघण्याची आहे, असं या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. या व्हिडीओला दीपिकाने ‘Stay Tunned’ असं कॅप्शन दिलं आहे. यावरुन हा व्हिडीओ दीपिकाच्या आगामी प्रोजेक्टबद्दल असल्याचं लक्षात येतं. दीपिकाच्या या पोस्टवर रणवीरने कमेंट केली आहे. रणवीरने कमेंटमध्ये “ही वेळ किस देण्याची आहे”, असं म्हटलं आहे.

हेही वाचा >> “मला या मुलाबरोबर…”, श्रेयस तळपदेने सांगितला ‘ओम शांती ओम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा शाहरुख खानचा किस्सा

दीपिकाच्या पोस्टवरील रणवीरच्या कमेंटने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या कमेंटमुळे रणवीर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याने केलेल्या कमेंटवर चाहत्यांनी रिप्लायचा पाऊस पाडला आहे.

हेही पाहा >> Photos : ६० तोळे सोने, म्हाडाचं घर अन्…, दीपाली सय्यद यांची एकूण संपत्ती माहितीये का? डोक्यावर आहे ३२ लाखांचं कर्जही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान दीपिका बॉलिवूडमध्ये १५ वर्ष पूर्ण झाली आहेत. २००७ साली ओम शांती ओम चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात दीपिका बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसह मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसली होती. ९ नोव्हेंबर २००७ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला काल १५ वर्ष पूर्ण झाली.